मुंबई, 6 जून : इंग्लंडनं लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये न्यूझीलंडचा (England vs New Zealand) 5 विकेट्सनं पराभव केला. जो रूटनं (Joe Root) कॅप्टनसी सोडल्यानंतर इंग्लंडची ही पहिलीच टेस्ट होती. या टेस्टमध्ये रूटनं नाबाद 115 रन केले. त्याच्या शतकामुळे इंग्लंडनं 277 रनचं लक्ष्य चौथ्या दिवशी पूर्ण केले. या विजयासह यजमान टीमनं 3 टेस्टच्या मालिकेत 1-0 नं आघाडी मिळवली आहे. लॉर्ड्स टेस्टमधील रूटच्या कामगिरीनं ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन मार्क टेलर (Mark Taylor) चांगलाच प्रभावित झाला आहे. रूट महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) टेस्ट क्रिकेटमधील रेकॉर्ड तोडू शकतो, असा दावा त्यानं केला आहे.
'स्काय स्पोर्ट्स' शी बोलताना टेलर म्हणाला की, 'जो रूट आणखी किमान 5 वर्ष नक्की खेळेल. त्यामुळे सचिनचा टेस्ट रेकॉर्ड त्याच्या आवाक्यात आहे, असं मला वाटतं. तो सचिनचा रेकॉर्ड तोडू शकतो. रूट गेल्या 2 वर्षांपासून जबरदस्त बॅटींग करत आहे. तो सध्या त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर आहे. तो फिट राहिला तर 15 हजारांपेक्षा जास्त रन करू शकतो.' असा दावा टेलरनं केला आहे.
लॉर्ड्स टेस्टच्या चौथ्या इनिंगमध्ये रूट बॅटींगला आला त्यावेळी इंग्लंडची अवस्था 2 आऊट 32 होती. त्यानंतर रूटनं नवा कॅप्टन बेन स्टोक्ससोबत 90 रनची भागिदारी केली. रूट-स्टोक्स जोडीनं इंग्लंडला सावरलं. स्टोक्स 54 रन काढून आऊट झाला. त्यानंतर रूटनं विकेट किपर-बॅटर बेन फॉक्ससोबत 120 रनची भागिदारी करत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या टेस्टमध्ये त्यानं 10 हजार रनचा टप्पा देखील ओलांडला.
IND vs ENG : रोहित शर्मानं सुरू केली इंग्लंड दौऱ्याची तयारी, पाहा Photo
टेस्टमध्ये सचिन बेस्ट
टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रन करण्याचा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिननं त्याच्या कारकिर्दीमध्ये 15921 रन केले. त्यानं टेस्टमध्ये 51 शतक झळकावले आहेत. रूट अद्याप सचिनच्या जवळपास 6 हजार रन मागं आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये 10 हजारपेक्षा जास्त रन करणारा तो क्रिकेट विश्वातील 14 वा तर इंग्लंडचा दुसरा खेळाडू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Joe root, Sachin tendulkar