जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / ENG vs NZ : दुसऱ्या टेस्टपूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का, कॅप्टन केन विलियमसनला कोरोनाची लागण

ENG vs NZ : दुसऱ्या टेस्टपूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का, कॅप्टन केन विलियमसनला कोरोनाची लागण

ENG vs NZ : दुसऱ्या टेस्टपूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का, कॅप्टन केन विलियमसनला कोरोनाची लागण

इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यातील दुसरी टेस्ट आजपासून (10 जून) नॉटिंघममध्ये खेळली जाणार आहे. या टेस्टपूर्वी पाहुण्या टीमला मोठा धक्का बसला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 जून : इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यातील दुसरी टेस्ट आजपासून (10 जून) नॉटिंघममध्ये खेळली जाणार आहे. या टेस्टपूर्वी पाहुण्या टीमला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा कॅप्टन केन विलियमसनला (Kane Williamson) कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तो दुसऱ्या टेस्टमधून बाहेर पडला आहे. विलियमसनची गुरूवारी रॅपिड अँटीजन टेस्ट झाली. तो रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तो किमान पाच दिवस आयसोलेशनमध्ये राहिल. न्यूझीलंडचे कोच गॅरी स्टीड यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विलियमसनच्या अनुपस्थितीमध्ये टॉम लॅथम न्यूझीलंड टीमची कॅप्टनसी करेल. तर हमिश रूदरफोर्डचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. 3 टेस्ट मॅचच्या या मालिकेत न्यूझीलंडनं पहिली टेस्ट मॅच 5 विकेट्सनं गमावली होती. न्यूझीलंडचे कोच गॅरी स्टीड यांनी सांगितले की, ‘या महत्त्वाच्या मॅचमध्ये केन विलियमसनला नाईलाजाने टीमच्या बाहेर बसावं लागेल. हे खरंच दुर्दैवी आहे. सर्वांनाच त्याच्याबद्दल वाईट वाटत आहे. तसंच तो देखील किती निराश झालं असेल हे आम्हाला माहिती आहे.’ न्यूझीलंडच्या अन्य खेळाडूंची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली आहे. त्यानंतरही संपूर्ण टीम कोरोना प्रोटोकॉलचे पालन करेल. कोणत्याही खेळाडूमध्ये कोरोनाची लक्षणं आढळली तर त्याची पुन्हा एकदा टेस्ट होणार आहे. यापूर्वी हेन्री निकोलस, ब्लेयर टिकनर आणि सेन जुर्गसेन हे न्यूझीलंडचे तीन खेळाडू वॉर्म अप मॅचपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर या सर्वांना आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले होते. IND vs SA : आवेश खाननं बॅट तोडणं पडलं भारी, टीम इंडियाला चुकवावी लागली मोठी किंमत इंग्लंड विरूद्धची पहिली टेस्ट गमावल्यानंतर विलियमसनला कोरोनाची लागण होणे हा न्यूझीलंडसाठी दुहेरी धक्का आहे. यापूर्वी तो दुखापतीमुळे पाच टेस्ट खेळू शकला नव्हता. विलियमसनच्या अनुपस्थितीमध्ये टॉम लॅथमनं बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका विरूद्ध झालेल्या कसोटी मालिकेत कॅप्टनसी केली होती. विलियमसन लॉर्ड्स टेस्टमध्ये फ्लॉप ठरला होता. त्यानं दोन इनिंगमध्ये मिळून 17 रन काढले होते. तर त्यापूर्वी झालेल्या वॉर्म अप मॅचमध्ये तर विलियमन शून्यावर आऊट झाला होता. टेस्ट सीरिजपूर्वी झालेल्या आयपीएलमध्ये विलियमन फ्लॉप ठरला होता. त्यानं सनरायझर्स हैदराबादकडून 19 च्या सरासरीनं फक्त 216 रन केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात