मुंबई, 10 जून : टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या टी20 सामन्यात (India vs South Africa) 7 विकेट्सनं पराभव झाला. या मॅचमध्ये टीम इंडियानं पहिल्यांदा बॅटींग करत 4 आऊट 211 रन केले. हा भारताचा टी20 इंटरनॅशनलमधील दक्षिण आफ्रिका विरूद्धचा सर्वाधिक स्कोअर आहे. टीम इंडिया या टार्गेटचं संरक्षण करू शकली नाही. दक्षिण आफ्रिकेनं 5 बॉल राखून 212 रन करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. टीम इंडिया हा सामना जिंकून वर्ल्ड रेकॉर्ड करेल असं काहीकाळ वाटत होते. त्याचवेळी आवेश खाननं (Avesh Khan) टाकलेल्या ओव्हरमध्ये असं काही झालं की सामन्याचं संपूर्ण चित्र बदललं. त्या ओव्हरनंतर रन काढण्यासाठी संघर्ष करत असलेल्या रस्सी व्हॅन डर डुसेनने (Rassie van der Dussen) जोरदार फटकेबाजी करत टीम इंडियाला पराभूत केलं. आवेश दक्षिण आफ्रिकेच्या इनिंगमधील 14 वी ओव्हर टाकण्यासाठी आला होता. त्या ओव्हरमधील पहिला बॉल वाईड पडला. त्यानंतरच्या तीन बॉलवर एकही रन निघाला नाही. आवेशनं तिसरा बॉल यॉर्कर टाकला. त्या बॉलला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न रस्सीनं केला. त्यावेळी रस्सी 26 बॉलमध्ये 22 रन करून खेळत होता. IND vs SA 2nd T20 : तिकीट विक्रीच्या वेळी जोरदार गोंधळ,महिलांमध्ये मारामारी, पोलिसांनी केला लाठीमार VIDEO रस्सीनं बॅट तुटल्यानं नवी बॅट घ्यावी लागली. नवी बॅट हातामध्ये येताच त्याचा खेळ पूर्ण बदलला. त्यानं फोर सिक्सची बरसात सुरू केली. या आक्रमक फटकेबाजीची सुरूवात त्यानं आवेश खानच्या शेवटच्या ओव्हरमध्ये फोर लगावत केली. रस्सीनं हर्षल पटेलनं टाकलेल्या 17 व्या ओव्हरमध्ये 3 सिक्स आणि 1 फोरसह 22 रन काढले. त्यानं बॅट बदलल्यानंतर पुढच्या 11 बॉलमध्ये 30 रन करत अर्धशतक झळकावलं. तो टीमला विजयी करूनच परतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







