Home /News /sport /

Ashes सीरिज संकटात, इंग्लंडचे दिग्गज खेळाडू बहिष्कार टाकण्याच्या तयारीत

Ashes सीरिज संकटात, इंग्लंडचे दिग्गज खेळाडू बहिष्कार टाकण्याच्या तयारीत

मँचेस्टर टेस्ट रद्द होण्याचा धक्का सहन करणाऱ्या इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या (ECB) अडचणीत भर पडली आहे. इंग्लंडचे बडे खेळाडू यावर्षीच्या शेवटी ऑस्ट्रेलि्यात होणाऱ्या अ‍ॅशेस सीरिजवर बहिष्कार (Ashes Series Boycott) घालण्याच्या तयारीत आहेत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 16 सप्टेंबर: मँचेस्टर टेस्ट रद्द होण्याचा धक्का सहन करणाऱ्या इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या (ECB) अडचणीत भर पडली आहे. इंग्लंडचे बडे खेळाडू यावर्षीच्या शेवटी ऑस्ट्रेलि्यात होणाऱ्या अ‍ॅशेस सीरिजवर बहिष्कार (Ashes Series Boycott) घालण्याच्या तयारीत आहेत. अ‍ॅशेस सीरिजला 8 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये क्वारंटाईनचे नियम अतिशय कडक आहेत.  इंग्लंडचे क्रिकेटपटू 25 डिसेंबरला ख्रिसमसच्या काळात कुटुंबासह क्वारंटाईनमध्ये राहण्याच्या विरोधात आहेत. 'इएसपीएन क्रिकइन्फो'नं दिलेल्या वृत्तानुसार इंग्लंड क्रिकेट बोर्ड अद्याप टीमच्या प्रमुख खेळाडूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाठवण्यासाठी ठाम आहे. ही सीरिज स्थगित करण्याचा बोर्डाचा कोणताही विचार नाही. त्यामुळे टीममधील वरिष्ठ अधिकारी आणि सपोर्ट स्टाफ नाराज आहे. या रिपोर्टनुसार टीम आणि इसीबी अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर इंग्लंड टीम  अ‍ॅशेस सीरिजमध्ये कमकुवत टीम उतरवण्याची शक्यता वाढली आहे. या रिपोर्टनुसार इसीबी सध्या वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करत आहे. यामध्ये पूर्ण टीमचा दौऱ्यावर सामूहिक बहिष्कार घालण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. तसं झालं तर इसीबी आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाला (CA) मोठा धक्का बसणार आहे. कडक निर्बंध पाळण्यास विरोध ऑस्ट्रेलियामध्ये क्वारंटाईन राहण्याचे नियम कडक आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना बांगलादेशच्या दौऱ्यातून परतल्यानंतर क्वारंटाईनचे कडक नियम पाळावे लागले होते. त्यांना ट्रेनिंग करण्यास किंवा रुममधून बाहेर पडण्यासही बंदी होती. विशेष म्हणजे हे सर्व क्रिकेटपटू बायोबबलमधूनच मायदेशी परतले होते. IPL 2021: स्पर्धा पुन्हा रद्द होऊ नये म्हणून BCCI ची खबरदारी, रोज होणार 2 हजार कोरोना टेस्ट इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना कुटुंबाला दौऱ्यावर आणण्याची परवानगी आहे. मात्र कोणता क्रिकेटपटू नंतर येणार असल्यास त्याला 14 डिसेंबरनंतरच परवानगी मिळणार आहे. त्या परिस्थितीमध्ये त्याला ख्रिसमसच्या एक दिवस आधीपर्यंत क्वारंटाईन राहवं लागेल. यापूर्वीही अनेक क्रिकेटपटूंनी क्वारंटाईन कालावधीमधील त्रासाचा उल्लेख केला आहे. या क्रिकेटपटूंना बराच काळ त्यांच्या मुलांसह हॉटेलातील बंद खोलीत राहण्याची इच्छा नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Australia, Cricket news, England

    पुढील बातम्या