Home /News /sport /

IPL 2021: स्पर्धा पुन्हा रद्द होऊ नये म्हणून BCCI ची खबरदारी, रोज होणार 2 हजार कोरोना टेस्ट

IPL 2021: स्पर्धा पुन्हा रद्द होऊ नये म्हणून BCCI ची खबरदारी, रोज होणार 2 हजार कोरोना टेस्ट

आयपीएल स्पर्धेचा दुसरा टप्पा (IPL 2021 2nd Phase) 19 सप्टेंबर म्हणजेच येत्या रविवारपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेला कोरोनाचा फटका बसू नये म्हणून BCCI नं जय्यत तयारी केली आहे.

    मुंबई, 16 सप्टेंबर: आयपीएल स्पर्धेचा दुसरा टप्पा (IPL 2021 2nd Phase) 19 सप्टेंबर म्हणजेच येत्या रविवारपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेच्या पहिला टप्पा कोरोना व्हायरसनं (Coronavirus) रद्द झाला होता. त्यावेळी आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला होता. त्यामुळे 29 मॅचनंतर ही स्पर्धा स्थगित (IPL 2021 Postponed) करण्यात आली. आता या स्पर्धेचे उर्वरित 31 सामने यूएईमध्ये होणार आहेत. यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएल स्पर्धेला कोरोनाचा फटका बसू नये म्हणून बीसीसीआयनं (BCCI) विशेष खबरदारी घेतली आहे. बीसीसीआयनं सलग दुसऱ्या वर्षी यूएईमील वीपीएस हेल्थकेअरशी करार केला आहे. ही कंपनी आयपीएलच्या दरम्यान कोरोना टेस्ट, तातडीची मेडिकल सेवा यासह आरोग्यासंबंधी सर्व व्यवस्था पाहणार आहे. आयपीएल स्पर्धेच्या काळात बायो-बबलमध्ये कोरोनाचा उद्रेक होऊ नये म्हणून जय्यत तयारी (IPL 2021 Bio-Bubble Protocol) करण्यात आली आहे. सर्व आठ टीमचे खेळाडू, कोच आणि सपोर्ट स्टाफच्या सदस्य यूएईमध्येमधील ज्या हॉटेलात उतरणार आहेत तेथील स्टाफची कोरोना टेस्ट झाली आहे. हे सर्व जण आयपीएल टीम येण्यापूर्वीच बायो-बबलमध्ये दाखल झाले आहेत. त्यांना बाहेर पडण्याची परवानगी नाही. आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान काम करणाऱ्या नर्स तसंच मेडिकल स्टाफला लीग समाप्त होईपर्यंत खेळाडूंचा मुक्काम असणाऱ्या हॉटेलमध्येच ठेवण्यात येणार आहे. स्पर्धेच्या दरम्यान एकूण 14 बायो बबल तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी 8 आयपीएल टीमसाठी, 3 सामना अधिकाऱ्यांसाठी आणि अन्य 3 ब्रॉडकास्टर्स आणि कॉमेंट्रेटरसाठी असतील. 100 सदस्यांची विशेष टीम 'दैनिक भास्कर' च्या रिपोर्टनुसार वीापीएस हेल्थकेअरनं आयपीएलसाठी 100 सदस्यांची विशेष टीम (IPL Covid-19 Management Team) तयार केली आहे. ही टीम खेळाडू आणि आयपीएलशी संबंधित सर्वांची मदत करणार आहे. प्रत्येक मॅचच्या दरम्या स्टेडियममध्ये दोन टीम उपलब्ध असतील. त्यामध्ये डॉक्टर, नर्स यांच्यासह लॅब टेक्निशियनचाही समावेश असेल. मॅचच्या दरम्यान गरज पडली तर कोरोना टेस्टसाठी सॅम्पल घेतले जाईल. त्याचबरोबर एअर अ‍ॅम्बूलन्ससह अन्य मेडिकल सुविधाही सज्ज ठेवण्यात येणार आहेत. मोठी बातमी : टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा 'या' कारणामुळे रद्द दर 3 दिवसांनी कोरोना टेस्ट आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात लागू करण्यात आलेल्या प्रोटोकॉलनुसार सर्व खेळाडू आणि अधिकाऱ्यांची दर तीन दिवसांनी कोरोना टेस्ट होणार आहे. यावेळी फॅन्सनाही स्टेडियममध्ये मॅच पाहण्यासाठी प्रवेश दिला जाणार आहे. पण त्यावेळी देखील स्टेडियममधील एकूण क्षमतेच्या 50 टक्के फॅन्सनाच प्रवेश देण्यात येणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Coronavirus, IPL 2021

    पुढील बातम्या