मुंबई, 22 डिसेंबर : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या अॅशेस सीरिजमधील (Ashes Series) पहिल्या दोन टेस्टमध्ये इंग्लंडचा (England Cricket Team) मोठा पराभव झाला आहे. आणखी एका अॅशेस सीरिजमध्ये पराभवाच्या उंबरठ्यावर असलेल्या इंग्लिश टीमच्या अडचणीत भर पडली आहे. इंग्लंडचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चरचं (Jofra Archer) आणखी एक ऑपरेशन झालं आहे. त्यामुळे तो आणखी काही महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. जोफ्रा दुखापतीमुळे गेल्या 9 महिन्यांपासून स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर आहे. आयपीएल स्पर्धा (IPL 2021) तसेच टी20 वर्ल्ड कपमधून (T20 World Cup 2021) त्याने माघार घेतली होती. अॅशेस सीरिजमध्ये देखील त्याची कमतरता इंग्लंडला जाणवत आहे. आता त्याच्या या ताज्या ऑपरेशनमुळे त्याचे पुनरागमन आणखी लांबले आहे. जोफ्रा आर्चरला 2020 साली झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात डाव्या हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाली होती. ती अद्याप बरी झालेली नाही. इंग्लंडची टीम या वर्षाच्या सुरूवातील भारत दौऱ्यावर आली होती. त्यावेळी देखील त्याला या दुखापतीचा त्रास झाला. त्यामुळे तो त्या सीरिजमधील चार पैकी दोन टेस्ट मॅच खेळू शकला. आर्चरचे मे महिन्यात एक ऑपरेशन देखील झाले आहे. पण, या ऑपरेशनंतरही तो पूर्ण फिट न झाल्यानं त्याला दुसऱ्यांदा ऑपरेशन करावे लागले आहे. IPL स्पर्धेत खेळणार का? जोफ्रा आर्चरनं आयपीएल 2020 (IPL 2020) मध्ये राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) सर्वात जास्त विकेट्स घेतल्या होत्या. तो यावर्षीच्या सिझनमध्ये (IPL 2021) दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्याच्या दुखापतीचे स्वरूप स्पष्ट नसल्यानं राजस्थाननं त्याला रिटेन केलेले नाही. 5 बॉलमध्ये 5 सिक्स लगावणाऱ्या बॅटरची आणखी एक कमाल, T20 क्रिकेटमध्ये ठोकलं शतक मार्च 2022 मध्ये होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यात विरुद्ध होणारी सीरिज आपण खेळू असे आर्चरने जाहीर केले होते. पण, ताज्या ऑपरेशनमुळे तो या सीरिजमध्ये खेळणार का ही शंका आहे. त्याचा आयपीएल स्पर्धेतील सहभाग देखील सध्या अनिश्चित आहे. अनफिट जोफ्रावर आगामी ऑक्शनमध्ये बोली लावायची की नाही? याबाबत आयपीएल टीममध्ये संभ्रम कायम असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.