मुंबई, 22 डिसेंबर : श्रीलंकेचा ओपनिंग बॅटर अविष्का फर्नांडो (Avishka Fernando) सध्या चांगलाच फॉर्मात आहे. लंका प्रीमियर लीग स्पर्धेत (Lanka Premier League) त्याने यापूर्वी 5 बॉलवर 5 सिक्स लगावले होते. त्यानंतर मंगळवारी झालेल्या क्वालिफायर 2 मध्ये त्याने आणखी एक धमाका केला आहे. जाफना किंग्स विरुद्ध दांबुला जायंट्स (Jaffna Kings vs Dambulla Giants) या मॅचमध्ये त्याने टी20 कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. त्याच्या शतकामुळे जाफनानं स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. अविष्कानं 63 बॉलमध्ये शतक झळकावलं. या खेळीत त्याने 10 फोर आणि 4 सिक्स लगावले. याचाच अर्थ त्याने सिक्स आणि फोरच्या मदतीनं 64 रन काढले. त्याचबरोबर त्याने अफगाणिस्तानच्या रहमानुल्लाह गुरबाज सोबत पहिल्या विकेट्ससाठी 13.2 ओव्हर्समध्ये 122 रनची भागिदारी केली. गुरबाजने 40 बॉलमध्ये 70 रन काढले.
We’ve seen many an explosive batting display this season. And then, Avishka Fernando came to the party!#LPL2021 #එක්වජයගමු #ஒன்றாகவென்றிடுவோம் #WinTogether #TheFutureisHere pic.twitter.com/ny12bwIAar
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) December 21, 2021
अविष्कानं यापूर्वी कँडी वॉरियर्स विरुद्ध 5 बॉलमध्ये 5 सिक्स लगावले होते. त्याने ऑफ स्पिनर तिलकरत्ने संपतच्या बॉलिंगवर हा पराक्रम केला होता. तोच फॉर्म कायम ठेवत अविष्कानं क्वालिफायर 2 मध्ये शतक झळकावले. त्याच्या शतकाच्या जोरावर जाफनानं निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 4 आऊट 210 असा विशाल स्कोअर केला. IND vs SA : टीम इंडियाच्या मदतीला सचिन आला धावून, विराटच्या टीमला दिला मोलाचा सल्ला 211 रनचा पाठलाग करताना दाम्बुला जायंट्सची सुरूवात खराब झाली. त्यांची अवस्था 4 आऊट 75 अशी झाली होती. त्यानंतर चामिका करूणारत्नेनं एकाकी झुंज देत 47 बॉलमध्ये नाबाद 75 रन काढले. त्याचा हा संघर्ष अपुरा ठरला. जाफनानं ही मॅच 23 रननं जिंकली. आता स्पर्धेच्या फायनलमध्ये जाफनाची लढत गॉल ग्लॅडीएटर्सशी (Galle Gladiators) होणार आहे.