मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

ENG vs WI : बॉल सोडला आणि दांडी उडाली, इंग्लंडचा कॅप्टन पाहातच राहिला! VIDEO

ENG vs WI : बॉल सोडला आणि दांडी उडाली, इंग्लंडचा कॅप्टन पाहातच राहिला! VIDEO

इंग्लंडची टीम सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर (England tour of West Indies) आहे. दोन्ही देशांमधील पहिल्या टेस्टला मंगळवारपासून सुरूवात झाली. या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडचा कॅप्टन कमाल करू शकला नाही.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 9 मार्च : इंग्लंडची टीम सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर (England tour of West Indies) आहे. दोन्ही देशांमधील पहिल्या टेस्टला मंगळवारपासून सुरूवात झाली. या टेस्टच्या पहिल्या दिवशी इंग्लंडनं 6 आऊट 268 रन केले. जॉनी बेअरस्टोनं (Jonny Bairstow) झळकावलेल्या शतकामुळे इंग्लंडची इनिंग सावरली. इंग्लंडचा कॅप्टन जो रूट (Joe Root) पहिल्या इनिंगमध्ये कमाल करू शकला नाही. तो फक्त 13 रनवर आऊट झाला. वेस्ट इंडिजचा फास्ट बॉलर केमार रोचनं (Kemar Roch) त्याला आऊट केले.

इंग्लंडच्या इनिंगमधील 9 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. या ओव्हरमधील दुसऱ्या बॉल रूटनं बॅक फुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. पण, रूटला तो समजलाच नाही. त्याने तो बॉल सोडून दिला आणि त्याची दांडी उडाली. रूटनं 14 बॉलमध्ये 3 फोरच्या मदतीनं 13 रन काढले. ऑस्ट्रेलिया विरूद्ध 5 टेस्टच्या अ‍ॅशेस सीरिजमध्येही रूट फारसा प्रभाव टाकू शकला नव्हता.

पहिल्या टेस्टमध्ये टॉस जिंकून बॅटींगचा निर्णय घेतलेल्या इंग्लंडची सुरूवात खराब झाली. 115 च्या स्कोअरवरच त्यांची निम्मी टीम आऊट झाली होती. जॉनी बेअरस्टोनं (Joony Bairstow) इंग्लंडच्या इनिंगला सावरले. त्याने बेन स्टोक्सच्या मदतीनं 5  विकेट्ससाठी 67 रनची पार्टनरशिप केली. स्टोक्स आऊट झाल्यानंतर बेन फोक्स आणि ख्रिस वोक्स यांनी बेअरस्टोला साथ दिली. त्यामुळे दिवसाच्या अखेर इंग्लंडला 200 रनचा टप्पा ओलांडता आला.

IPL 2022 पूर्वी टीमची डोकेदुखी वाढली, तोडगा काढण्यासाठी BCCI करणार शर्थीचे प्रयत्न

अ‍ॅशेस सीरिजमध्ये शतक झळकावलेल्या बेअरस्टोनं त्याचा फॉर्म वेस्ट इंडिजविरूद्धही कायम राखत शतक झळकावले. पहिल्या दिवसाच्या अखेरीस बेअरस्टो 109 तर ख्रिस वोक्स 24 रन काढून नाबाद होते. वेस्ट इंडिजकडून रोच, सिल्स आणि होल्डर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

First published:

Tags: Cricket news, England, Joe root, West indies