मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

ENG vs WI : धोनीच्या सहकाऱ्यानं कॅप्टनसी मिळताच बॅटींग आणि बॉलिंगमध्ये कमाल, टीमला जिंकून दिली मॅच

ENG vs WI : धोनीच्या सहकाऱ्यानं कॅप्टनसी मिळताच बॅटींग आणि बॉलिंगमध्ये कमाल, टीमला जिंकून दिली मॅच

महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) सहकाऱ्यानं कॅप्टनसी मिळताच बॅटींग आणि बॉलिंगमध्ये कमाल करत टीमला मॅच जिंकून दिली आहे.

महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) सहकाऱ्यानं कॅप्टनसी मिळताच बॅटींग आणि बॉलिंगमध्ये कमाल करत टीमला मॅच जिंकून दिली आहे.

महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) सहकाऱ्यानं कॅप्टनसी मिळताच बॅटींग आणि बॉलिंगमध्ये कमाल करत टीमला मॅच जिंकून दिली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 30 जानेवारी : इंग्लंडनं वेस्ट इंडिज विरूद्ध सुरू असलेल्या (England vs West Indies) टी20 मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. शनिवारी झालेला चौथा सामना मोईन अलीनं (Moeen Ali) गाजवला. इंग्लंडच्या टी20 टीमचा नियमित कॅप्टन इयन मॉर्गनच्या (Eoin Morgan) अनुपस्थितीमध्ये मोईन टीमची कॅप्टनसी करत आहे. मोईननं कॅप्टनसी मिळताच बॅटींग आणि बॉलिंगमध्येही सरस खेळ करत टीमला विजय मिळवून दिला. आता या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी 20 सामना आज (रविवार) होणार आहे.

इंग्लंडनं पहिल्यांदा बॅटींग करत निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 6 आऊट 193 रन केले होते. त्याला उत्तर देताना वेस्ट इंडिजला 5 आऊट 159 रन करता आले. मोईन अलीनं या मॅचमध्ये 63 रन काढले. त्याचबरोबर 2 विकेट्स देखील घेतल्या. त्यालाच 'प्लेयर ऑफ द इयर' पुरस्कार देण्यात आला.

मोईन अलीला आयपीएल 2022 (IPL 2022) मेगा ऑक्शनपूर्वी महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) 8 कोटींमध्ये रिटेन केले आहे. त्यानं आयपीएलपूर्वी बॅट आणि बॉलनं जोरदार कामगिरी करत ही निवड सार्थ ठरवली आहे.

ब्रिजटाऊनमध्ये झालेल्या चौथ्या टी20 सामन्यात यजमान वेस्ट इंडिजचा कॅप्टन कायरन पोलार्डनं (Kieron Pollard) टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्धार केला. इंग्लंडकडून जेसन रॉयनं अर्धशकतक झळकावले. त्याने 42 बॉलमध्ये 52 रन केले. तर जेम्स विन्सीनं 34 रनची आक्रमक खेळी केली. हे दोघं आऊट झाल्यानंतर मोईन अलीनं सर्व सूत्रं हाती घेतली.

IND vs WI : वेस्ट इंडिजविरूद्ध भारतीय पोलार्डचा टीम इंडियात समावेश!

7 सिक्स लगावले

मोईननं लियाम लिविंगस्टोनच्या मदतीनं वेस्ट इंडिजच्या बॉलर्सची धुलाई केली. इंग्लंडच्या 18 व्या ओव्हरमध्ये त्यानं  जेसन होल्डरच्या बॉलिंगवर सलग 4 सिक्स लगावले. त्यानं 23 बॉलमध्ये अर्धशतक झळकावले. आऊट होण्यापूर्वी मोईननं 28 बॉलमध्ये 7 सिक्सच्या मदतीनं 63 रन केले होते. सॅम बिलिंग्जनं शेवटच्या दोन बॉलवर सिक्स लगावत टीमचा स्कोअर 20 ओव्हरमध्ये 193 पर्यंत नेला.

वेस्ट इंडिजनं 194 रनचा पाठलाग करताना सुरूवात दमदार केली. ब्रँडन किंग  आणि काईल मेअर्स यांनी पहिल्या विकेटसाठी 7.2 ओव्हर्समध्ये 64 रनची भागिदारी केली. चांगल्या सुरूवातीनंतर वेस्ट इंडिजची इनिंग गडगडली. मोईननं 2 विकेट्स घेत त्याला ब्रेक लावला. कायरन पोलार्ड आणि जेसन होल्डरनं मॅचमधील आव्हान कायम ठेवण्याचा बराच प्रयत्न केला. पण, त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही.

First published:

Tags: Cricket news, Csk, England, MS Dhoni, West indies