मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /ENG vs NZ : ऐतिहासिक कामगिरीनंतर जो रूट भावुक, कॅप्टनसीचा सांगितला वाईट अनुभव

ENG vs NZ : ऐतिहासिक कामगिरीनंतर जो रूट भावुक, कॅप्टनसीचा सांगितला वाईट अनुभव

England vs New Zealand: इंग्लंड टीमनं लॉर्ड्स टेस्टमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला. या विजयानंतर माजी कॅप्टन जो रूट (Joe Root) भावुक झाला होता.

England vs New Zealand: इंग्लंड टीमनं लॉर्ड्स टेस्टमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला. या विजयानंतर माजी कॅप्टन जो रूट (Joe Root) भावुक झाला होता.

England vs New Zealand: इंग्लंड टीमनं लॉर्ड्स टेस्टमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला. या विजयानंतर माजी कॅप्टन जो रूट (Joe Root) भावुक झाला होता.

मुंबई, 6 जून : टेस्ट क्रिकेटमधील सातत्यपूर्ण निराशाजनक कामगिरीनंतर इंग्लंड क्रिकेट टीमनं अखेर विजय मिळवला आहे. लॉर्ड्स टेस्टमध्ये इंग्लंडनं न्यूझीलंडचा (England vs New Zealand) 5 विकेट्सनं पराभव केला. इंग्लंडच्या टेस्ट टीमचा माजी कॅप्टन जो रूट (Joe Root) या विजयाचा शिल्पकार ठरला. जो रूटनं टेस्ट कारकिर्दीमधील 26 वं शतक झळकावलं. तो 115 रनवर नाबाद राहिला.

रूटनं या खेळीच्या दरम्यान टेस्ट क्रिकेटमध्ये 10 हजार रनचा टप्पा देखील ओलांडला. ही कामगिरी करणारा तो इंग्लंडचा दुसरा क्रिकेटपटू आहे. जो रूट मागील वर्षभरापासून जोरदार फॉर्ममध्ये आहे. त्यानं सातत्यानं रन केल्यानंतरही इंग्लंड टीमची कामगिरी निराशाजनक होत होती. इंग्लिश टीमनं अ‍ॅशेस सीरिज 0-4 या फरकानं गमावली. कॅप्टन रूटच्या कारकिर्दीमधील शेवटच्या 17 टेस्टमध्ये इंग्लंडनं फक्त 1 मॅच जिंकली. या खराब कामगिरीमुळे रूटनं कॅप्टनसीचा राजीनामा दिला. आता त्याच्या जागेवर बेन स्टोक्सची कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्टोक्सची कॅप्टन म्हणून ही पहिलीच टेस्ट मॅच होती.

रूटनं न्यूझीलंड विरूद्ध विजय मिळल्यानंतर कॅप्टनसीच्या काळातील अनुभव सांगितला आहे. 'माझ्यावर कॅप्टनसीचा वाईट परिणाम झाला होता. मला कॅप्टनसीचं ओझं मैदानावरच सोडून येणे जमत नव्हते. माझ्या कुटुंबावरही त्याचा परिणाम झाला होता. माझ्यासाठी तो चांगला अनुभव नव्हता.' असं रूटनं यावेळी सांगितलं.

Happy Birthday Ajinkya : बॉलिवूड कथेप्रमाणे आहे अजिंक्य - राधिकाची लव्ह स्टोरी

जो रूटनं 64 टेस्टमध्ये इंग्लंडची कॅप्टनसी केली. तो इंग्लंडच्या टेस्ट टीमचा सर्वात यशस्वी कॅप्टन आहे. त्यानंतरही टीमला खराब कालखंडातून बाहेर काढण्यात त्याला अपयश आलं. आता बेन स्टोक्स यामध्ये यशस्वी होईल, अशी आशा रूटनं व्यक्त केली आहे. मी यासाठी बेन स्टोक्सला सर्व मदत करायला तयार आहे, असं रूटनं यावेळी स्पष्ट केलं.

First published:

Tags: Cricket news, England, Joe root, New zealand