जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / ENG vs NZ : न्यूझीलंडच्या खेळाडूमुळे प्रेक्षकाचं नुकसान, टीमनं अशी केली भरपाई, पाहा VIDEO

ENG vs NZ : न्यूझीलंडच्या खेळाडूमुळे प्रेक्षकाचं नुकसान, टीमनं अशी केली भरपाई, पाहा VIDEO

ENG vs NZ : न्यूझीलंडच्या खेळाडूमुळे प्रेक्षकाचं नुकसान, टीमनं अशी केली भरपाई, पाहा VIDEO

इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यातील दुसरी टेस्ट नॉटिंगहममध्ये खेळली जात आहे. या मॅचमध्ये न्यूझीलंडच्या खेळाडूनं प्रेक्षकाचं नुकसान केलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 जून : इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड (England vs New Zealand)  यांच्यातील दुसरी टेस्ट नॉटिंगहममध्ये खेळली जात आहे. या टेस्टच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडनं चांगली सुरूवात केली. त्यांनी पहिल्या दिवसाच्या अखेरीस 4 आऊट 318 रन केले. डेरिल मिचेल 81 तर टॉम ब्लंडेल 67 रनवर नाबाद होते. मिचेलनं त्याच्या 81 रनच्या खेळीत दोन सिक्स लगावले. त्यापैकी जॅक लिचच्या बॉलवर लगावलेला सिक्स सरळ स्टेडिअममध्ये बसलेल्या प्रेक्षकाच्या हातामधील बिअरच्या ग्लासमध्ये पडला. त्यामुळे त्याच्या हातामधील ड्रिंक पडले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर न्यूझीलंड टीमनं पुढं येत केलेल्या कृतीची सर्वजण प्रशंसा करत आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर मिचेलनं ज्या महिला प्रेक्षकांच्या हातामधून बियरचा ग्लास पडला तिची भेट घेतली. मिचेलनं बराच वेळ तिच्याशी संवाद साधला. त्याचबरोबर तिच्यासोबत फोटो काढून पुढच्या वेळी बॉल आला तर कॅच पकड असा सल्ला दिला. न्यूझीलंड टीमनं या महिलेला  बियर ग्लास गिफ्ट देत नुकसान भरपाई देखील दिली आहे.

जाहिरात
जाहिरात

नॉटिंघम टेस्टमध्ये टॉल गमावून पहिल्यांदा बॅटींगसाठी उतरलेल्या न्यूझीलंडची सुरूवात चांगली झाली. विल यंग आणि टॉम लॅथम या ओपनिंग जोडीनं पहिल्या विकेटसाठी 84 रनची पार्टनरशिप केली. लॅथम 26 तर यंग 47 रन काढून आऊट झाले. लंचनंतर न्यूझीलंडनं हेन्री निकोल्स आणि डेवॉन कॉनवे यांच्या विकेट गमावल्या. निकोल्सला 30 रनवर कॅप्टन बेन स्टोक्सनं आऊट केलं. तर जेम्स अँडरसननं कॉनवेची (46) विकेट घेतली. बॅटींगची अजब थट्टा! फक्त 23 रनमध्ये गमावल्या 8 विकेट्स, अशी निसटली हातातील मॅच न्यूझीलंडनं शेवटच्या सेशनमध्ये एकही विकेट गमावली नाही. मिचेल 147 बॉलमध्ये 81 तर ब्लंडेल 136 बॉलमध्ये 67 रन काढून खेळत आहे. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी आत्तापर्यंत 149 रनची नाबाद भागिदारी करत न्यूझीलंडची स्थिती भक्कम केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात