मुंबई, 11 जून : टी20 क्रिकेट हा बॅटर्सचा खेळ मानला जातो. पण, काही वेळा बॉलर्स प्रत्यक्ष मॅचमध्ये इतके भारी पडतात की त्यामुळे मॅचचं संपूर्ण चित्र बदलतं. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या टी20 ब्लास्ट क्रिकेटमध्येही असाच प्रकार घडला. ग्लोसेस्टरशर विरूद्ध ससेक्स या लो स्कोरिंग सामन्यात बॉलर्स मॅचचे हिरो ठरले. या मॅचमध्ये ग्लोसेस्टरशरनं पहिल्यांदा बॅटींग करत 6 आऊट 145 रन केले. टी20 क्रिकेटमध्ये 146 रनचं लक्ष्य हे सोपं मानलं जातं. ससेक्सची मॅचमधील स्थिती देखील भक्कम होती. पण, पाहता-पाहता त्यांच्या हातातून मॅच निसटली. ससेक्सची सुरूवात चांगली झाली नाही. टीम सिफर्ट शून्यावर आऊट झाला. तर कॅप्टन रवी बोपारा 10 रन काढून आऊट झाला. त्यानंतर टॉम एस्सोप आणि फिन एडसन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 70 रनची भागिदारी करत टीमला सावरले. 118 रनवर ससेक्सला तिसरा धक्का बसला.
Turnaround = Complete 🤯
— Vitality Blast (@VitalityBlast) June 10, 2022
What. A. Match.#Blast22 pic.twitter.com/P8vLB7vlqT
ससेक्सला विजयासाठी फक्त 28 रन हवे होते आणि त्यांच्या 7 विकेट्स बाकी होत्या. त्यानंतर मॅचचं चित्र संपूर्ण बदललं. ग्लोसेस्टरशर बॉलर्लनी मॅचचं पारडं फिरवलं. फक्त 23 रनमध्ये ससेक्सचे उर्वरित खेळाडू आऊट झाले. त्यांची संपूर्ण टीम 141 रनवर ऑल आऊट झाली आणि 4 रननं त्यांचा पराभव झाला. ससेक्सनं एकेकाळी मुठीत असणारा सामना 4 रननं गमावला. IND vs SA : टीम इंडियात होणार 2 बदल! वाचा कुणाला मिळणार तिकीट, कुणाचा पत्ता कट ग्लोसेस्टरकडून डेव्हिड पायने आणि जॅक चॅपेल यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर टॉम स्मिथननं दोन जणांना आऊट केलं. ग्लेन फिलिप्सलाही एक यश मिळालं. तर ग्लेन फिलिप्सनं 53 बॉलमध्ये सर्वात जास्त 66 रन केले. त्याशिवाय जॅक टेलरनं 46 रनची खेळी केली.