Home /News /sport /

ENG vs NZ : लॉर्ड्समधील पराभवानंतर न्यूझीलंडला आणखी एक धक्का, प्रमुख खेळाडू मालिकेतून आऊट

ENG vs NZ : लॉर्ड्समधील पराभवानंतर न्यूझीलंडला आणखी एक धक्का, प्रमुख खेळाडू मालिकेतून आऊट

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) जिंकणाऱ्या या टीमसाठी मालिकेतील उर्वरित दोन टेस्ट महत्त्वाच्या आहेत. त्यापूर्वी त्यांना मोठा धक्का बसला आहे.

    मुंबई, 7 जून : इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यात लॉर्ड्समध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये न्यूझीलंडचा पराभव झाला. या पराभवानंतर तीन टेस्टच्या मालिकेत न्यूझीलंड 0-1 नं पिछाडीवर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) जिंकणाऱ्या या टीमसाठी मालिकेतील उर्वरित दोन टेस्ट महत्त्वाच्या आहेत. त्यापूर्वी त्यांना मोठा धक्का बसला आहे. अनुभवी ऑल राऊंडर कॉलिन डी ग्रँडहोम (Colin De Grandhomme) दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून आऊट झाला आहे. त्यानं या दुखापतीमुळे इंग्लंडच्या दुसऱ्या इनिंगमध्ये फक्त 3.5 ओव्हर बॉलिंग केली होती. दोन्ही देशांमधील दुसरी टेस्ट 10 जूनपासून नॉटिंगघमध्ये सुरू होणार आहे. कॉलिन डी ग्रँडहोमला या दुखापतीमधून सावरण्यासाठी 10 ते 12 आठवड्यांचा वेळ लागणार असल्याची माहिती न्यूझीलंडचे कोच गॅरी स्टीड यांनी दिली आहे. त्याच्या जागेवर मायकल ब्रेसवेलचा उर्वरित सीरिजसाठी टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. ग्रँडहोमनं लॉर्ड्स टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये 50 बॉलमध्ये 42 रनची खेळी केली होती. टीमला सर्वाधिक आवश्यकता असताना त्यानं हा झुंजार खेळ केला. लॉर्ड्स टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये न्यूझीलंडची अवस्था 6 आऊट 36 अशी झाली होती. त्यावेळी ग्रँडहोमनं ही खेळी करत टीमला 132 रनपर्यंत पोहचवलं. त्यानंतर त्यानं इंग्लंडच्या पहिल्या इनिंगमध्ये जो रूटची महत्त्वाची विकेट घेतली. दुसऱ्या इनिंगमध्ये मात्र तो दुखापतीमुळे चौथी ओव्हर पूर्ण करू शकला नाही. IND vs SA : टीम इंडियाच्या सरावाला हार्दिकची दांडी, BCCI नं दिलं स्पष्टीकरण ग्रँडहोम लॉर्ड्स टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये पहिल्याच बॉलवर रन आऊट झाला. लॉर्ड्स इतिहासात गेल्या 43 वर्षांमध्ये एखादा बॅटर गोल्डन डकवर रन आऊट होण्याचा हा दुसराच प्रसंग आहे. यापूर्वी 1979 साली टीम इंडियाचे के. व्यंकटराघवन पहिल्याच बॉलवर रन आऊट झाले होते.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Cricket news, England, New zealand

    पुढील बातम्या