Home /News /sport /

IND vs SA : टीम इंडियाच्या सरावाला हार्दिकची दांडी, BCCI नं दिलं स्पष्टीकरण

IND vs SA : टीम इंडियाच्या सरावाला हार्दिकची दांडी, BCCI नं दिलं स्पष्टीकरण

India vs South Africa: टीम इंडियानं दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या मालिकेसाठी सरावाला सुरूवात केली आहे. या सरावाच्या पहिल्या दिवशी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) अनुपस्थित होता.

    मुंबई, 7 जून : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) सर्वात जास्त चर्चा आहे. हार्दिकच्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या नव्या आयपीएल टीमनं पहिल्याच सिझममध्ये विजेतेपद पटकावले. त्यानं आयपीएल 2022 मध्ये बॅटींग, बॉलिंगसह कॅप्टनसीनंही सर्वांना प्रभावित केलं आहे. आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी हार्दिकचा हा फॉर्म टीम इंडियासाठी महत्त्वाचा आहे. काही क्रिकेट तज्ज्ञ तर टीम इंडियाच्या कॅप्टनपदाचा प्रबळ दावेदार म्हणून हार्दिककडं पाहात आहेत. त्यामुळे भारतीय टीम सोमवारी दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या मालिकेच्या तयारीसाठी पहिल्यांदा मैदानात उतरली, त्यावेळी सर्वांचं हार्दिककडं लक्ष होतं. पण, हार्दिक मैदानात दिसलाच नाही. पाच सामन्यांच्या या मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर हार्दिकचा टी20 वर्ल्ड कपनंतर पहिल्यांदाच भारतीय टीममध्ये समावेश झाला आहे. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये हार्दिकवर मोठी जबाबदारी या मालिकेत असेल. सरावाच्या पहिल्या दिवशी हार्दिक अनुपस्थित असल्यानं वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर बीसीसीआयनं या विषयावर स्पष्टीकरण दिलं आहे.'हार्दिक पांड्या अद्याप टीम इंडियात दाखल झालेला नाही. तो मंगळवारी दाखल होऊ शकतो,' असं स्पष्टीकरण बीसीसीआयच्या सूत्रांनी एएनआयला दिलं आहे. त्याच्या फिटनेसबाबतच्या सर्व चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या असून हार्दिक पूर्ण फिट असल्याचा दावा केला आहे. IND vs SA : टीम इंडियात KKR च्या दिग्गजाची एन्ट्री, खेळाडूंचा होणार मोठा फायदा हार्दिक पांड्या 29 मे पर्यंत आयपीएल फायनलमध्ये व्यस्त होता. त्यानंतर तो गुजरात टायटन्सच्या विजयी परेडमध्ये सहभागी झाला होता. या सर्व कारणांमुळे त्याला विश्रांतीसाठी एक दिवस जास्त देण्यात आला आहे. हार्दिक प्रमाणेच युजवेंद्र चहल आणि हर्षल पटेल देखील पहिल्या दिवशी सरावात सहभागी झाले नाहीत. चहल राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल फायनल खेळला होता. तर हार्दिक रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा प्रमुख खेळाडू असल्यानं 27 मे पर्यंत आयपीएलमध्ये व्यस्त होता.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: BCCI, Cricket news, Hardik pandya, South africa, Team india

    पुढील बातम्या