Home /News /sport /

ENG vs NZ : राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूचा चिवट प्रतिकार, दुसऱ्या दिवसावर न्यूझीलंडचं वर्चस्व

ENG vs NZ : राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूचा चिवट प्रतिकार, दुसऱ्या दिवसावर न्यूझीलंडचं वर्चस्व

इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यात लॉर्ड्सवर सुरू असलेल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवसावर पाहुण्या टीमनं वर्चस्व मिळवलं आहे.

    मुंबई, 4 जून : इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यात लॉर्ड्सवर सुरू असलेल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवसावर पाहुण्या टीमनं वर्चस्व मिळवलं आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये सुरूवातीला झालेल्या पडझडीनंतर न्यूझीलंडनं मॅचमध्ये कमबॅक केले. राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) आयपीएलमध्ये खेळलेल्या डॅरेल मिचेल आणि टॉम ब्लंडेल या जोडीनं पाचव्या विकेटसाठी नाबाद 180 रनची भागिदारी केली. या भागिदारीमुळे न्यूझीलंडनं दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस 4 आऊट 236 रन केले असून त्यांच्याकडे 227 रनची आघाडी आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मिचेल 97 तर ब्लंडेल 90 रन काढून नाबाद होते. इंग्लंडकडून या टेस्टमध्ये पदार्पण करणार्या मॅट पोट्सनं दुसऱ्या इनिंगमध्येही चारपैकी 2 विकेट्स घेतल्या. त्यानं कॅप्टन केन विल्यमसनला दुसऱ्या इनिंगमध्येही आऊट केले. त्याच्या भेदक माऱ्यानं न्यूझीलंडची अवस्था 4 आऊट 56 झाली होती. त्यानंतर मिचेल आणि ब्लंडेल जोडीनं टीमला सावरलं. यापूर्वी इंग्लंडनं 7 आऊट 116 पासून पुढे खेळण्यास सुरूवात केली होती. लॉर्ड्स टेस्टच्या पहिल्या दिवशी 17 विकेट्स पडल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या उर्वरित 3 विकेट्स झटपट पडल्या. इंग्लंडला पहिल्या इनिंगमध्ये अवघ्या 9 रनची आघाडी मिळाली. न्यूझीलंडची पहिली इनिंग 132 रनवर संपुष्टात आली होती. त्याला उत्तर देताना इंग्लंडला पहिल्या इनिंगमध्ये फक्त 141 रनच करता आले. ENG vs NZ : प्लेयिंग XI तर दूरच, टीममध्येही नव्हतं नाव, 320 किमी प्रवास करून दुसऱ्या दिवशी टेस्ट पदार्पण इंग्लंडकडून जॅक क्राऊलीनं सर्वात जास्त 43 रन केले. त्यांच्या 8 खेळाडूंना दोन अंकी रन करता आले नाहीत. कॅप्टन बेन स्टोक्स फक्त 1 रन काढून आऊट झाला. न्यूझीलंडकडून टीम साऊदीनं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर ट्रेन्ट बोल्टला 3 विकेट्स मिळाल्या.  कॉलिन डि ग्रँडहोमनं 2 तर जेमीसननं 1 विकेट घेतली.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Cricket news, England, New zealand

    पुढील बातम्या