Home /News /sport /

ENG vs NZ : प्लेयिंग XI तर दूरच, टीममध्येही नव्हतं नाव, 320 किमी प्रवास करून दुसऱ्या दिवशी टेस्ट पदार्पण!

ENG vs NZ : प्लेयिंग XI तर दूरच, टीममध्येही नव्हतं नाव, 320 किमी प्रवास करून दुसऱ्या दिवशी टेस्ट पदार्पण!

इंग्लंड आणि न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यात लॉर्ड्समध्ये 3 टेस्ट मॅचच्या सीरिजची पहिली टेस्ट खेळवली जात आहे. या टेस्टमध्ये इंग्लंडसाठी मॅटी पॉट्स (Matty Potts) आणि मॅथ्यू पार्किनसन (Mathew Parkinson) यांनी पदार्पण केलं.

पुढे वाचा ...
    लंडन, 3 जून : इंग्लंड आणि न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यात लॉर्ड्समध्ये 3 टेस्ट मॅचच्या सीरिजची पहिली टेस्ट खेळवली जात आहे. टेस्टच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा 132 रनवर ऑल आऊट झाल्यानंतर इंग्लंडची इनिंग दुसऱ्या दिवशी 141 रनवर संपली, त्यामुळे त्यांना पहिल्या इनिंगमध्ये 9 रनची आघाडी मिळाली. या टेस्टमध्ये इंग्लंडसाठी मॅटी पॉट्स (Matty Potts) आणि मॅथ्यू पार्किनसन (Mathew Parkinson) यांनी पदार्पण केलं. पॉट्सला तर या सामन्यात प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं होतं. पण पार्किनसनचं पदार्पण अनोखं ठरलं. पार्किनसनला न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी इंग्लंडच्या टीममध्ये निवडण्यातही आलं नव्हतं. लॉर्ड्स टेस्टच्या पहिल्या पहिल्या एका तासामध्येच इंग्लंडचा स्पिनर जॅक लिच फिल्डिंग करत असताना दुखापतग्रस्त झाला. बाऊंड्री लाईनवर लिच डोक्यावर आपटला, यानंतर त्याला चक्कर यायला लागली, त्यामुळे लिच पहिल्या टेस्टमधून बाहेर झाला. जॅक लिच बाहेर झाल्यामुळे इंग्लंडच्या टीममध्ये दुसरा कोणताही स्पिनर नव्हता. या कारणामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने लंडनपासून 320 किमी लांब मॅनचेस्टरमध्ये असलेल्या मॅट पार्किनसनला तडकाफडकी बोलावून घेतलं. पार्किनसन पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावरच टीममध्ये आला, त्यामुळे त्याला दुसऱ्या दिवशी पदार्पणाची संधी मिळाली. आयसीसीच्या कनकशन सबस्टिट्यूटच्या नियमानुसार दुखापतग्रस्त खेळाडूऐवजी दुसऱ्या खेळाडूचा टीममध्ये समावेश केला जाऊ शकतो, पण यासाठी दुखापत झालेल्या खेळाडूसारखाच त्याला बदली करणारा खेळाडू असावा. म्हणजेच लिच स्पिनर असल्यामुळे त्याच्याऐवजी इंग्लंडला स्पिनरलाच मैदानात उतरवणं बंधनकारक होतं. टीममध्ये दुसरा कोणताही स्पिनर नसल्यामुळे इंग्लंडला पार्किनसनला 320 किमी वरून बोलवावं लागलं. पार्किनसनला मॅचच्या दुसऱ्या दिवशी त्याची टेस्ट कॅप मिळाली. इंग्लंडने 130 रनवर 9 विकेट गमावल्या होत्या आणि न्यूझीलंडच्या स्कोअरपासून ते 2 रन पिछाडीवर होते. पार्किनसनने मैदानात येताच जोरदार शॉट मारून इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. पण किवी बॉलरसमोर तो फार काळ टिकू शकला नाही. 8 बॉलमध्ये 8 रन करून तो आऊट झाला. पार्किनसनच्या या छोट्या खेळीमुळे इंग्लंडला 9 रनची आघाडी मिळवण्यात यश आलं. 25 वर्षांचा मॅट पार्किनसन लँकशायरकडून काऊंटी खेळतो. लेग स्पिनर असलेल्या पार्किनसनने 37 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 23.84 च्या सरासरीने 126 विकेट घेतल्या, यामध्ये एक वेळा मॅचमध्ये 10 विकेट तसंच 4 वेळा इनिंगमध्ये 5 विकेट घेण्याचा रेकॉर्ड पार्किनसनने केला आहे. याआधी तो इंग्लंडकडून वनडे आणि टी-20 देखील खेळला आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या