Home /News /sport /

ENG vs NZ : लॉर्ड्सवर दिसला 2019 वर्ल्ड कप फायनलचा अ‍ॅक्शन रिप्ले, बेन स्टोक्सची बॅट आली आडवी! VIDEO

ENG vs NZ : लॉर्ड्सवर दिसला 2019 वर्ल्ड कप फायनलचा अ‍ॅक्शन रिप्ले, बेन स्टोक्सची बॅट आली आडवी! VIDEO

इंग्लंडला मिळालेल्या 'त्या' अतिरिक्त 6 रनचा वर्ल्ड कप फायनल टाय करण्यात निर्णायक वाटा होता. आता तीन वर्षांनी पुन्हा एकदा त्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.

    मुंबई, 5 जून : इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यात 2019 साली झालेली वर्ल्ड कप फायनल क्रिकेट फॅन्सच्या आजही लक्षात आहे. त्या फायनलमध्ये बेन स्टोक्स (Ben Stokes) इंग्लंडच्या ऐतिहासिक विजयाचा हिरो ठरला होता. फायनलमध्ये निर्णायक क्षणी न्यूझीलंडच्या फिल्डरचा थ्रो त्याच्या बॅटला लागून बांऊड्रीच्या पार गेला होता. इंग्लंडला मिळालेल्या 'त्या' अतिरिक्त 6 रनचा फायनल मॅच टाय करण्यात निर्णायक वाटा होता. आता तीन वर्षांनी पुन्हा एकदा त्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात लॉर्ड्सवर पहिली टेस्ट सुरू आहे. या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी हा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे यावेळी देखील बेन स्टोक्स बॅटींग करत असतानाच हा प्रकार घडला. शनिवारी मॅचमधील तिसऱ्या सेशनमध्ये ट्रेन्ट बोल्टनं (Trent Boult) टाकलेला बॉल जो रूटनं (Joe Root) पूल केला. तो बॉल न्यूझीलंडच्या फिल्डरनं स्केवयर लेगला अडवला. यावेळी रन काढण्यासाठी बाहेर गेलेला बेन स्टोक्स धावत क्रिझमध्ये परतला. यावेळी वर्ल्ड कप फायनलप्रमाणेच न्यूझीलंडच्या फिल्डरचा थ्रो स्टोक्सच्या बॅटला लागून दुसरिकडं गेला. पण, न्यूझीलंडचे फिल्डर यंदा सज्ज होते. त्यांनी तो बॉल बाऊंड्रीच्या बाहेर जाऊ दिला नाही. ट्रेन्ट बोल्टनंही अंपायरकडं इशारा करत रन न देण्याचं अपिल केलं. यावेळी स्टोक्स, बोल्टसह न्यूझीलंडच्या अन्य खेळाडूंना हसू आवरलं नाही. कॉमेंट्री पॅनलमधील न्यूझीलंड आणि इंग्लंडचे माजी क्रिकेटपटूही तीन वर्षांपूर्वी याच मैदानात घडलेली घटना आठवून हसत होते. लॉर्ड्स टेस्टमध्ये रंगत लॉर्ड्स टेस्टच्या तिसऱ्या दिवशी सकाळाी न्यूझीलंडची दुसरी इनिंग 285 रनवर संपुष्टात आली. इंग्लंडसाठी विजयाचं 277 रनचं लक्ष्य आहे. या लक्ष्यचा पाठलाग करताना यजमानांची अवस्था 4 आऊट 69 झाली होती. त्यानंतर जो रूट आणि बेन स्टोक्स या जोडीनं पाचव्या विकेटसाठी 90 रनची भागिदारी करत इंग्लंडची इनिंग सावरली. ICC नं टेस्ट क्रिकेटबाबत दिली वाईट बातमी, वाचा टीम इंडियावर काय होणार परिणाम स्टोक्सनं कॅप्टन म्हणून पहिल्याच टेस्टमध्ये अर्धशतक झळकावलं. तो 54 रन काढून आऊट झाला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा स्कोर 5 आऊट 216 असा होता. जो रूट 77 तर बेन फोक्स 9 रन काढून नाबाद आहेत. इंग्लंडला विजयासाठी आणखी 61 रनची आवश्यकता असून न्यूझीलंडला 5 विकेट्सची गरज आहे.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Ben stokes, Cricket news, England, New zealand

    पुढील बातम्या