जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / स्टम्पनं फटकेबाजी करणाऱ्या 9 वर्षाच्या मुलाला IPL टीम करणार मदत, कारण वाचून वाटेल अभिमान

स्टम्पनं फटकेबाजी करणाऱ्या 9 वर्षाच्या मुलाला IPL टीम करणार मदत, कारण वाचून वाटेल अभिमान

स्टम्पनं फटकेबाजी करणाऱ्या 9 वर्षाच्या मुलाला IPL टीम करणार मदत, कारण वाचून वाटेल अभिमान

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका लहान मुलाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) झाला आहे. या व्हिडीओतील मुलगा बॅटनं नाही तर स्टम्पनं क्रिकेटचे सर्व प्रकारचे शॉट्स खेळताना (Kid batting with stump) दिसत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 मे : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका लहान मुलाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral)  झाला आहे. या व्हिडीओतील मुलगा बॅटनं नाही तर स्टम्पनं क्रिकेटचे सर्व प्रकारचे शॉट्स खेळताना (Kid batting with stump) दिसत आहे.  ड्राईव्ह, स्कूप, स्वीप, फ्लिक यासारखे फटके तो अगदी सहज एका स्टम्पनं लगावतो. सर्व प्रकारच्या बॉलवर त्याच्याकडं उत्तर आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो मुलगा अगदी एका रात्रीत स्टार बनला. जबरदस्त टॅलेंट असलेल्या या मुलाचा खर्च करण्यास  एक आयपीएल (IPL) टीम  तयार झाली आहे. कोण आहे हा मुलगा? हा 9 वर्षांचा मुलगा केरळचा आहे. त्याचा हा व्हिडीओ राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कॅप्टन संजू सॅमसननं (Sanju Samson) पाहिला. त्यानं आपल्या फ्रँचायझीच्या अधिकाऱ्यांना हा व्हिडीओ फॉरवर्ड केला. या मुलाची बॅट लॉकडाऊनमध्ये तुटली होती. त्यानंतर त्यानं स्टम्पनं सराव करण्यास सुरुवात केली, आणि अगदी कमी कालावधीत तो स्टम्पनं देखील अगदी सहज बॅटींग करु लागला, ही माहिती समजल्यानंतर ‘राजस्थान रॉयल्स’नं या मुलाचा खर्च करण्याचा निर्णय घेतला, असं वृत्त  ‘मल्याळम मनोरमा’ नं दिलं आहे.

जाहिरात

‘द ग्रेड क्रिकेटर’ या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. सिमेंटच्या पिचवर त्यानं एका स्टम्पनंही बॅटींग कशी करता येते याचं प्रात्याक्षिक दाखवलं. त्याच्या मागे दोन बाजूला दोन स्टम्प आहेत. तर मिडल स्टम्पचा वापर तो बॅट म्हणून करतोय. सर्व प्रकराच्या बॉलवर त्याच्याकडं उत्तर आहे. बांबूची बॅट बॉलरची वाढवू शकते डोकेदुखी; बिग हिटिंगसाठी BEST आहे हा पर्याय, संशोधनातून उघड त्याचा हा व्हिडीओ क्रिकेट फॅन्समध्ये तर लोकप्रिय झालाच. पण इंग्लंडचा माजी कॅप्टन केविन पीटरसननं देखील हा व्हिडीओ शेअर करत या मुलाच्या बॅटींगचं कौतुक केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात