Home /News /sport /

IPL 2021: कोरोनातून बरा झालेला CSK चा दिग्गज म्हणाला, 'भारतामध्ये परिस्थिती गंभीर पण...'

IPL 2021: कोरोनातून बरा झालेला CSK चा दिग्गज म्हणाला, 'भारतामध्ये परिस्थिती गंभीर पण...'

चेन्नई सुपर किंग्सचा बॅटिंग कोच माईक हसीला (Michael Hussey) काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. हसीनं भारतामधील परिस्थिती गंभीर असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

    चेन्नई, 8 मे : चेन्नई सुपर किंग्सचा बॅटिंग कोच माईक हसीला (Michael Hussey) काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. आता त्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. हसी सध्या चेन्नईमधील एका हॉटेलमध्ये आहे. तो आता अन्य ऑस्ट्रेलियन खेळाडूंप्रमाणे मालदिवला जाऊ शकतो. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार "दिल्लीहून चेन्नईला येण्यापूर्वी हसीचा रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. तो आता ठीक आहे. अन्य विदेशी खेळाडू आता रवाना झाले आहेत. तर मुख्य प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग शनिवारी रवाना होणार आहेत." 'भारतामध्ये परिस्थिती गंभीर' हसीनं 'सिडनी मॉर्निंग हेराल्ड' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, "मी आता आराम करत असून मला पहिल्यापेक्षा चांगलं वाटत आहे. मी सीएसकेचा आभारी आहे. त्यांनी माझी काळजी घेतली. भारतामध्ये सध्या गंभीर परिस्थिती आहे. पण, मी नशिबवान आहे, मला पूर्ण मदत मिळाली." हसीची सोमवारी चाचणी करण्यात आली होती, मंगळवारी त्याचा रिपोर्ट आला. यापूर्वी चेन्नईचा  बॉलिंग कोच लक्ष्मीपती बालाजी (L. Balaji) कोरोना पॉझिटीव्ह आढळला होता.हसीचा पहिला रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर दुसऱ्यांदा चाचणी घेण्यात आली होती, त्यावेळी देखील तोच रिपोर्ट आला. त्याची टेस्ट निगेटीव्ह येईल अशी चेन्नईच्या मॅनेजमेंटला आशा होती. यापूर्वी टीमचे सीईओ काशी विश्वनाथ यांचा पहिला रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर त्यांचा दुसरा रिपोर्ट निगेटीव्ह आला.आता नव्या माहितीनुसार त्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आला असून तो चेन्नईमधील हॉटेलमध्ये आयसोलेशनचा कालावधी पूर्ण करणार आहे. कोरोनाच्या भीतीनं केन विल्समसननं 3 दिवसांपूर्वीच सोडली दिल्ली, बोर्डाला कल्पनाच नाही! KKR च्या खेळाडूला लागण आयपीएल स्पर्धेचा चौदवा सिझन (IPL 2021) स्थगित झाला आहे. त्यानंतरही खेळाडूंना कोरोनाची (Covid-19) लागण झाल्याच्या घटना उघड होत आहेत.  केकेआरचा बॅट्समन टीम सिफर्ट (Tim Seifert) याला कोरोनाची लागण झाली आहे. सिफर्ट अन्य खेळाडूंसोबत न्यूझीलंडला रवाना होणार होता. आता त्याच्यावर चेन्नईमध्ये उपचार करण्यात येणार आहेत. सिफर्ट या आठवडाभरात कोरोनाची लागण झालेला केकेआरचा तिसरा खेळाडू आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona virus in india, Cricket, Csk, IPL 2021

    पुढील बातम्या