Home /News /sport /

Captain Cool धोनीसाठी 'ही' गोष्ट आहे अतिशय कठिण, स्वतःच केला खुलासा

Captain Cool धोनीसाठी 'ही' गोष्ट आहे अतिशय कठिण, स्वतःच केला खुलासा

captain cool धोनीला 'ही' गोष्ट वाटतीय अतिशय कठिण; स्वतःच केला खुलासा

captain cool धोनीला 'ही' गोष्ट वाटतीय अतिशय कठिण; स्वतःच केला खुलासा

MS Dhoni on entering in Bollywood: धोनीने जर आयपीएलमधून निवृत्ती घेतली तर तो पुढे काय करणार याची उस्तुकता सर्वांना लागली आहे. धोनीच्या अनेक चाहत्यांनी त्याला बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याचा सल्लाही दिला आहे. पण त्याने या सल्ल्यासंदर्भात भीती व्यक्त केली आहे.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर: भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) ने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (MS Dhoni retirement from international cricket) निवृत्ती जाहीर केली. दरम्यान, आता त्याच्या आयपीएल (MS Dhoni in IPL2021) निवृत्तीची चर्चा रंगली आहे. त्यातच धोनीने जर आयपीएलमधून निवृत्ती घेतली तर तो पुढे काय करणार याची उस्तुकता सर्वांना लागली आहे. धोनीच्या अनेक चाहत्यांनी त्याला बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याचा सल्लाही दिला आहे. पण त्याने या सल्ल्यासंदर्भात भीती व्यक्त केली आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अनेक क्रिकेटर्स बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावून पाहतात. त्यामुळे धोनीही बॉलिवूडमध्ये अभिनय करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, या चर्चेवर धोनी म्हणाला, 'बॉलिवूड खरोखर माझ्यासाठी नाही. तुम्ही जाहिरातींबद्दल बोलत असाल तर त्यात मी जे काही करतोय, करु शकतो, त्यातच मी आनंदी आहे. जेव्हा चित्रपटांचा प्रश्न येतो तेव्हा मला वाटते की हा एक अतिशय कठीण व्यवसाय आहे आणि ते करणे खूप कठीण आहे. मी ते फिल्मी स्टार्सवर सोपवतो, कारण ते खरोखरच चांगले आहेत. मी क्रिकेटशी जोडलेला असेन. मी फक्त जाहिरातींद्वारे अभिनयच्या जवळ येऊ शकतो, पण त्यापेक्षा जास्त नाही'. बॉलिवूड चित्रपटात कॅमिओ खूप कमी लोकांना माहित आहे की धोनीने एका बॉलिवूड चित्रपटात कॅमिओ केला होता, पण त्याचा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही. ‘हुक या क्रूक’ असे या चित्रपटाचे नाव होते, हा चित्रपट डेव्हिड धवन दिग्दर्शित करत होते. या चित्रपटात जॉन अब्राहम आणि श्रेयस तळपदे सारखे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचे शूटिंग 2010 मध्ये सुरू झाले. या चित्रपटाची कथा एका अशा मुलाची होती ज्याचे स्वप्न आहे भारतीय क्रिकेट संघात सामील होण्याचे, पण दुर्दैवाने त्याचा प्रवास तुरुंगातच संपतो. या चित्रपटात धोनीने एक कॅमिओ केला होता, परंतु काही कारणामुळे शूटिंग नंतर पूर्ण होऊ शकले नाही आणि या चित्रपटाचं कायमचं पॅकअप करण्यात आले. ...तर आयपीएलच्या निवृत्तीच्या चर्चेवर धोनी म्हणाला 'जेव्हा अलविदा करायची वेळ येईल तेव्हा तुम्ही येऊ शकता आणि मला सीएसकेकडून खेळताना बघू शकता. तुम्हाला मला अलविदा करण्याची संधी मिळेल. आम्ही चेन्नईमध्ये येऊ आणि अखेरची मॅच खेळू, अशी अपेक्षा आहे. सगळ्या चाहत्यांनाही भेटू,' असं भावुक वक्तव्य धोनीने केले आहे. नुकतंच हरभजन सिंगने तामिळ चित्रपट ‘फ्रेंडशिप’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हरभजन सिंगने आपल्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याची इच्छादेखील व्यक्त केली आहे. याआधी ब्रेट ली, अजय जडेजा, विनोद कांबळी यांसारख्या क्रिकेटपटूंनीही अभिनयात आपले नशीब आजमवले आहे. पण कोणालाही अपेक्षित यश मिळाले नाही.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Cricket news, IPL 2021, Mahendra singh dhoni, MS Dhoni

  पुढील बातम्या