मुंबई, 5 जून : गौतम गंभीरनं (Gautam Gambhir) क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर कॉमेंट्रीमध्ये इनिंग सुरू केली आहे. त्याचबरोबर तो आयपीएल टीमसोबतही काम करतो. आयपीएल 2022 मध्ये गंभीर लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) टीमचा मेंटॉर होता. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली लखनऊनं पहिल्याच आयपीएल सिझनमध्ये 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश केला होता.
गंभीर सध्या पूर्व दिल्लीमधून भारतीय जनता पक्षाचा खासदार आहे. खासदार असूनही कॉमेंट्री आणि आयपीएलच्या माध्यमातून तो पैसा कमावत असल्यानं त्याच्यावर अनेकदा टीका होते. गंभीरनं एका पत्रकार परिषदेमध्ये आयपीएलमध्ये काम करत असल्याची कोणतीही लाज वाटत नसल्याचं सांगत विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
काय म्हणाला गंभीर?
गौतम गंभीर त्याच्या मतदारसंघात जनरसोई चालवतो. हे काम तो खासदार म्हणून मिळणाऱ्या निधीमधून नाही तर स्वत:च्या खर्चातून करतो. त्यामुळे जन रसोई चालवण्यासाठी पैसे कमवणे भाग असल्याचं गंभीरनं यावेळी स्पष्ट केले. 'एका महिन्यात 5 हजार लोकांच्या खाण्यासाठी 25 लाख रूपये लागतात. याचा पूर्ण वर्षाचा खर्च पावणे तीन कोटी (2.75 कोटी) होतो. मी 25 लाख खर्च करून ग्रंथालय सुरू केलं आहे. हा सर्व खर्च मी MPLAD फंडमधून करत नाही.
सीधा सवाल…सीधा जवाब 👌 @GautamGambhir “हो सके इसे छाप देना 😊 pic.twitter.com/AKrR2SbTzl
— Gaurav Arora (@gauravbir786) June 3, 2022
या फंडातून मिळणाऱ्या पैशांमधून जनरसोई चालू शकत नाही. माझ्या घरीही झाडाला पैसे लागले नाहीत. त्यामुळे 5 हजार जणांना जेवण मिळावं म्हणून मी काम करतो. मी कॉमेंट्री करतो हे सांगायला मला कोणतीही लाज वाटत नाही. मी आयपीएलमध्ये पैसा कमावतो त्याच्यामागे खास उद्देश आहे.' असे गंभीरने स्पष्ट केले.
ENG vs NZ : लॉर्ड्सवर दिसला 2019 वर्ल्ड कप फायनलचा अॅक्शन रिप्ले, बेन स्टोक्सची बॅट आली आडवी! VIDEO
गौतम गंभीर बराच काळापासून कॉमेंट्री करतो. त्यानं टीम इंडियाच्या सामन्यांबरोबरच आयपीएलमध्येही कॉमेंट्री केली आहे. आयपीएल 2022 मध्ये गंभीरच्या मार्गदर्शनाखाली लखनऊ सुपर जायंट्सनं दमदार कामगिरी केली. त्यांनी 14 पैकी 9 सामने जिंकत 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Gautam gambhir, Ipl 2022