मुंबई, 17 एप्रिल : भारतीय खेळाडू आयपीएल स्पर्धेत (IPL 2022) व्यस्त असतानाच चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) इंग्लंडमध्ये कौंटी चॅम्पियनशिप खेळतोय. टीम इंडियातील जागा गमावलेला पुजारा पहिल्या इनिंगमध्ये फक्त 6 रन काढून आऊट झाला होता. पण, दुसऱ्या इनिंगमध्ये त्यानं चिवट खेळी करत त्याच्या ससेक्स टीमला संकटातून बाहेर काढलं आहे. या मॅचमध्ये डर्बीशायरनं पहिल्या इनिंगमध्ये 8 आऊट 505 रन केले. त्याला उत्तर देताना ससेक्सची टीम पहिल्या इनिंगमध्ये फक्त 174 रनवर ऑल आऊट झाली.
फॉलोऑनची नामुश्की मिळाल्यानंतर ससेक्सनं दुसऱ्या इनिंगमध्ये 2 आऊट 278 रन केले आहेत. त्यांची टीम अजूनही 53 रननं पिछाडीवर असून अद्याप एक दिवसाचा खेळ बाकी आहे. ससेक्सकडून कॅप्टन टॉम हँन्स आणि चेतेश्वर पुजारा दिवसाच्या अखेरी नाबाद होते. हँन्स 164 तर पुजारा 57 रनवर नाबाद आहे. या जोडीनं टीमचा नामुश्कीदायक पराभव जवळपास टाळला आहे. आता शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त खेळ करत इनिंग लांबवण्याचा या जोडीचा प्रयत्न असेल.
ससेक्सकडून पदार्पण करणारा पुजारा पहिल्या इनिंगमध्ये दुसऱ्या दिवशी बॅटींगला उतरला होता. त्याला डर्बीशायरच्या अनुज डलनं लवकर आऊट केलं. त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये पुजारानं कोणतीही चूक केली नाही.
IPL 2022 : इशान किशनला होणार शिक्षा! 'त्या' कृतीचा VIDEO VIRAL
ससेक्सही पुजाराची चौथी कौंटी टीम आहे. तो यापूर्वी डर्बीशायर, नॉटिंघमशायर आणि यॉर्कशरकडून खेळला आहे. ससेक्सकडून या मॅचमध्ये पाकिस्तानचा विकेट किपर मोहम्मद रिझवान यानंही पदार्पण केलं आहे. चेतेश्वर पुजारानं खराब फॉर्ममुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर टीम इंडियामधील जागा गमावली आहे. टेस्ट टीममध्ये कमबॅक करण्यासाठी त्याला कौंटी क्रिकेटमध्ये कमाल करावी लागेल. मागील सिझनमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) सदस्य असलेल्या पुजाराला यंदाच्या ऑक्शनमध्ये कोणत्याही आयपीएल टीमनं खरेदी केलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.