KLमुंबई, 18 एप्रिल: विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यानंतर भारतीय फॅन्सच्या आशा तेवत ठेवणारा बॅट्समन म्हणजे के.एल. राहुल (KL Rahul). विकेटकिपिंग आणि बॅटींग या दोन्ही क्षेत्रामध्ये राहुलनं चांगली कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज (Punjab Kings) टीमचा कॅप्टन असलेला राहुल आज 29 वर्षांचा झाला आहे. तो आज त्याच्या वाढदिवशी दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) विरुद्ध मैदानात उतरणार आहे.
के.एल. राहुलचं पूर्ण नाव कन्नौर लोकेश राहुल (Lokesh Rahul) आहे. त्याचे वडील लोकेश हे इंजिनिअर तर आई राजेश्वरी प्राध्यापक आहेत. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की वडिलांच्या चुकीमुळे त्याचं नाव राहुल ठेवण्यात आलं. राहुलचे वडील सुनील गावसकर यांचे फॅन आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलालाही गावसकरांच्या मुलाचं नाव देण्याचं ठरवलं होतं. पण, बारशाच्या दिवशी ते गावसकरांच्या मुलाचं नाव विसरले आणि त्यांनी मुलाचं नाव रोहनच्या ऐवजी राहुल ठेवले.
अभ्यासात चांगल्या असणाऱ्या राहुलनं इंजिनिअर व्हावं अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. पण त्याला खेळाची जास्त आवड होती. राहुलनं वयाच्या 11 व्या वर्षापासून क्रिकेटला गांभिर्यानं घेण्यास सुरुवात केली. राहुलच्या या पॅशनला त्याच्या घरच्यांनी नेहमी पाठिंबा दिला. 2010 साली त्यानं कर्नाटककडून फर्स्ट क्लास क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.
केएल राहुलची कारकिर्द
केएल राहुलनं फर्स्ट क्लास क्रिकेट खेळून आता 10 वर्षांचा कालावधी झाला आहे. त्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. क्रिकेटच्या तीन्ही प्रकारात सिक्स लगावत शतक करणारा तो एकमेव खेळाडू आहे. टी20 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये चौथ्या क्रमांकावर येऊन शतक करणाराही तो एकमेव खेळाडू आहे.
(वाचा : IPL 2021: मुंबई इंडियन्सच्या विजयाचा कोहली आणि धोनीच्या टीमला फटका )
राहुलनं 2014 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्टमध्ये तर 2016 साली झिम्बाब्वे विरुद्ध वन-डे आणि टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानं आजवर 36 टेस्टमध्ये 2 हजार 6 रन, 38 वन-डेमध्ये 1509 आणि 49 टी 20 मॅचमध्ये 1557 रन केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, Kl rahul, Punjab kings