मुंबई, 15 डिसेंबर : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लीग (Big Bash League) स्पर्धेत एक मोठी दुर्घटना घडली. या स्पर्धेतील मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये बॅटरने मारलेला बॉल स्टेडियममधील प्रेक्षकाच्या डोक्यात लागला. यामुळे तो रक्तबंबाळ झाला. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे सर्वांना धक्का बसला.
होबार्ट हुरिकेन्स (Hobart Hurricanes) विरुद्ध पर्थ स्कॉचर्स (Perth Scorchers) या मॅचमध्ये ही दुर्घटना घडली. होबार्टच्या इनिंगमधील आठव्या ओव्हरमध्ये बेन मॅकडरमॅटने जोरदार सिक्स लगावला. प्रेक्षकांमध्ये गेलेला हा बॉल पकडण्याचा प्रयत्न एका फॅनने केला. त्यावेळी कॅच घेताना त्याचा अंदाज चुकला आणि बॉल थेट त्याच्या डोक्यात बसला. यामुळे तो तिथेच जमिनीवर पडला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
OUCH the Canes are smacking sixes aplenty at Hobart - and Old Mate tried to catch this one with his face... #BBL11 pic.twitter.com/rcpbzPgV7j
— KFC Big Bash League (@BBL) December 14, 2021
पर्थने या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटींग केली. त्यांनी सुरुवातीला झटपट विकेट्स गमावल्या. त्यानंतर मिचेल मार्शच्या नाबाद शतकामुळे पर्थने 5 आऊट 182 रन केले. 183 रनचा पाठलाग करताना होबार्टची संपूर्ण इनिंग 129 रनवर संपुष्टात आली. होबार्टकडून बेन मॅकडमॅटने सर्वात जास्त 41 रन काढले. पर्थकडून मिल्सने 23 रन देऊन 3 विकेट्स घेतल्या. एश्टन एगरमे 21 रनमध्ये 2 आणि एण्ड्रयू टायनं 31 रन देत 2 विकेट्स घेत, पर्थच्या मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
IND vs SA: धोनीचा शिष्य होणार संकटमोचक, टीम इंडियात घेणार विराटची जागा!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Cricket, Video viral