Home /News /sport /

कोण होणार टीम इंडियाचा सिलेक्टर? आगरकर नाही तर या 5 जणांची होणार मुलाखत

कोण होणार टीम इंडियाचा सिलेक्टर? आगरकर नाही तर या 5 जणांची होणार मुलाखत

बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने राष्ट्रीय निवड समीतीच्या दोन पदांसाठी पाच जणांची नावे निश्चित केली असून त्यांची बुधवारी मुलाखत होणार आहे.

    मुंबई, 04 मार्च : बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने राष्ट्रीय निवड समीतीच्या दोन पदांसाठी पाच जणांची नावे निश्चित केली आहेत. समिती बुधवारी निवडण्यात आलेल्या माजी खेळाडूंची मुलाखत घेणार आहे. यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद याचाही समावेश आहे. क्रिकेट सल्लागार समितीमध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू मदन लाल, आर पी सिंग, सुलक्षणा नाइक हे आहेत. त्यांनी 44 अर्जांची छाननी केल्यानंतर पाच जणांना मुलाखतीसाठी बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याचे निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद आणि त्यांचे सहकारी गगन खोडा यांच्या जागी दोन नव्या सदस्यांची नियुक्ती होणार आहे. यासाठी भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने अर्ज केला होता. मात्र त्याला मुलाखतीसाठी बोलावण्यात आलेलं नाही. समितीने व्यंकटेश प्रसाद, सुनील जोशी, एल शिवरामाकृष्णन, हरविंदर सिंग आणि राजेश चौहान यांना मुलाखतीसाठी आमंत्रित केलं आहे. निवड समितीच्या प्रमुख पदासाठी व्यंकटेश प्रसाद यांचे पारडे जड आहे. त्यांनी भारताकडून 33 कसोटी आणि 161 एकदिवसीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 196 तर कसोटीत 96 गडी बाद केले आहेत. 2007 मध्ये ते भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक होते आणि त्यावेळी भारतानं टी20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर 2009 मध्ये त्यांना कोणतेही कारण न देता हटवण्यात आलं होतं. तसंच आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. हे वाचा :Women T20 World cup : ...तर सेमीफायनल न खेळता टीम इंडिया थेट फायनलमध्ये धडकणार व्यंकटेश प्रसाद यांच्याशिवाय सुनील जोशींचे नावही आघाडीवर आहे. त्यांनी 15 कसोटी आणि 69 एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीत त्यांच्या नावावर 41 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 69 विकेट आहेत. हैदराबाद आणि जम्मू-काश्मीर क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होते. 2015 मध्ये ओमान तर 2016 मध्ये आसाम क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केलं आहे. हे वाचा : हार्दिक पांड्याचं तुफान! गोलंदाजांची धुलाई करत झळकावलं वेगवान शतक
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या