Home /News /sport /

Good News! Women's IPL चा मार्ग मोकळा, BCCI नं घेतला ऐतिहासिक निर्णय

Good News! Women's IPL चा मार्ग मोकळा, BCCI नं घेतला ऐतिहासिक निर्णय

बीसीआयनं (BCCI) महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएलची सुरूवात (Women’s IPL) करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षीपासून ही स्पर्धा सुरू होऊ शकते.

    मुंबई, 26 मार्च : आयपीएल स्पर्धेच्या 15 व्या सिझनला (IPL 2022) आजपासून (शनिवार) सुरूवात होत आहे. चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) या मॅचनं हा सिझन सुरू होईल. त्याचवेळी बीसीसीआयनं महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएलची सुरूवात (Women’s IPL) करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षीपासून ही स्पर्धा सुरू होऊ शकते. बीसीसीआयच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत याबाबतचा ऐतिहासिक प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यानुसार 6 टीममध्ये महिला आयपीएलचा पहिला सिझन खेळवण्यात येईल. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी सांगितले की, 'या विषयाला बीसीसीआयच्या सर्वसाधारण समितीनं मान्यता देणे आवश्यक आहे. पुढच्या वर्षी ही स्पर्धा सुरू करण्याची आमची योजना आहे.' गव्हर्निंग कौन्सिलचे संचालकर ब्रिजेश पटेल यांनीही या विषयाला दुजोरा दिला आहे. 'महिला आयपीएल स्पर्धेच्या आयोजनाची तयारी सुरू आहे. यावर्षी आम्ही तीन टीममध्ये महिला टी20 चॅलेंज टुर्नामेंट (Women’s T20 Challenge) घेणार आहोत. 3 टीमची ही स्पर्धा 2019 मध्ये सुरू झाली आहे. आयपीएल  'प्ले ऑफ' च्या दरम्यान ही स्पर्धा होते. गेल्या वर्षी कोरोनामुळे ही स्पर्धा होऊ शकली नाही. यंदा ही स्पर्धा आयपीएल 'प्ले ऑफ' च्या दरम्यान मुंबई आणि पुण्यात होणार आहे. 'बापाला पाठवा, तुमची लायकी नाही' पाकिस्तानच्या पराभवानंतर फॅन्स संतापले! महिलांच्या पहिल्या आयपीएल स्पर्धेत 6 टीम असतील. या टीमच्या निवडीचा प्रस्ताव सध्याच्या आयपीएल फ्रँचायझींना दिला जाईल. 'क्रिकबझ' नं दिलेल्या रिपोर्टमुसार बीसीसीआयनं यंदा आयपीएल टीमची संख्या 8 वरून 10 केली आहे. तेव्हा बोर्डानं याच फ्रँचायझींना महिला टीम बनवण्याचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव यशस्वी झाला नाही तर बोर्ड नव्यानं निविदा मागवणार आहे.' बीसीसीआयनं महिला आयपीएल सुरू करावं अशी मागणी बऱ्याच काळापासून होत आहे. कारण क्रिकेट वेस्टइंडिजनं कॅरेबियन प्रीमियर लीगसह (CPL) तीन टीमची महिला लीग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शेजारच्या पाकिस्ताननंही या प्रकारच्या लीगची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये यापूर्वीपासून महिला बिग बॅश लीग स्पर्धा सुरू आहे. तर इंग्लंडमध्येही टी20 ब्लास्ट आणि द हंड्रेडमध्ये महिला टीमचे सामने होता. या टीमकडून भारतीय खेळाडूही खेळल्या आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BCCI, Cricket news, Indian women's team, Ipl, Ipl 2022

    पुढील बातम्या