मुंबई, 26 मार्च : ऑस्ट्रेलियानं लाहोर टेस्टमध्ये पाकिस्तानचा (Australia vs Pakistan) 115 रननं मोठा पराभव केला. पाकिस्ताननं लाहोर टेस्टमधील पराभवानंतर टेस्ट सीरिजही 0-1 या फरकानं गमावली. या पराभवाचे मोठे पडसाद पाकिस्तानमध्ये उमटले आहेत. रावळपिंडी आणि कराचीमध्ये झालेल्या पहिल्या दोन्ही टेस्ट ड्रॉ झाल्या होत्या. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला विजयासाठी 351 रनचं आव्हान दिलं होतं. याचा पाठलाग करताना पाकिस्तानची टीम पाचव्या दिवशी अखेरच्या सत्रात 235 रनवर ऑल आऊट झाली. पाकिस्तानच्या पराभवानंतर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहे. क्रिकेट फॅन्सनी मीम आणि कमेंट्सच्या माध्यमातून टीमवर नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय फॅन्सनी ही साधत पाकिस्तानच्या टीमला ट्रोल केले आहे. एका फॅननं पाकिस्तान टीमला ट्रोल करत म्हंटलं आहे की, ’ बापाला पाठवा, हे तुम्हाला जमणार नाही.’ टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाच्या त्यांच्या देशात पराभव केला होता. त्या ऐतिहासिक सीरिजचा संदर्भ देत फॅन्सनी ही प्रतिक्रिया दिली आहे. बाबर आझमच्या टीमची क्रिकेट फॅन्सनं जोरदार धुलाई केली आहे.
Le Australia to Pakistan, after defeating them at their own home, not even rented home:#AUSvsPAK pic.twitter.com/UO3Hu4NYLk
— Avinash (@avinash18vk) March 25, 2022
Winning vs aus in their backyard or in owns is not everyone Cup of tea untill you are india #AUSvsPAK pic.twitter.com/HZzltBCPOT
— ABHISHEK-45 (@legend_bhaiya1) March 25, 2022
ऑस्ट्रेलियाकडून लाहोर टेस्टमध्ये नॅथन लायनने (Nathan Lyon) 83 रन देऊन 5 विकेट घेतल्या. लायनशिवाय ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनेही (Pat Cummins) लाहोर टेस्टमध्ये चांगली बॉलिंग केली. त्याने दुसऱ्या इनिंगमध्ये 23 रन देऊन 3 विकेट मिळवल्या. हा ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानच्या जमिनीवरचा तिसरा टेस्ट सीरिज विजय आहे. 24 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन टीम पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेली होती. World Test Championship : पाकिस्तानच्या पराभवाचा टीम इंडियाला मोठा फायदा पाकिस्तानने अखेरच्या सत्रात 5 विकेट गमावल्या. कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने 2016 नंतर पहिल्यांदाच घराबाहेर टेस्ट सीरिज जिंकली आहे. तसंच आशिया खंडात सीरिज जिंकण्याचं ऑस्ट्रेलियाचं स्वप्न 11 वर्षांनी पूर्ण झालं आहे.

)







