नवी दिल्ली 28 जानेवारी : भारत आणि इंग्लंडमध्ये (IND VS ENG) होणाऱ्या सामन्याची जगभरातील चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. सीरिज सुरू होण्यासाठी केवळ एक आठवडा शिल्लक आहे. मात्र, ब्रिटनचे चाहते कोणत्या टीव्ही चॅनलवर हा सामना पाहणार याबाबतचा निर्णय अजूनही झालेला नाही. टेलीग्राफ स्पोर्टसनं दिलेल्या रिपोर्टनुसार, या मॅचचा अधिकृत प्रसारक असलेला स्टार इंडिया इतर प्रसारकांना हक्क विकण्याऐवजी स्वतःच्याच हॉटस्टार या स्ट्रीमिंग अॅपवर मॅच दाखवण्याचा विचार करत आहे.
रिपोर्टमध्ये असं म्हटलं गेलं आहे, की भारताचा ऑस्ट्रेलियातील विजय तसंच इंग्लंडच्या श्रीलंका दौऱ्यादरम्यान स्काय स्पोर्टसवर प्रेक्षकांची संख्या पाहता हक्क विकण्याची शक्यता वाढली आहे आणि विशेष म्हणजे चॅनल 4 नंही यात रस दाखवला आहे. या अधिकारांची किंमत जवळपास 2 कोटी पौंड इतकी आहे. चार टेस्ट मॅचची मालिका 5 फेब्रुवारीपासून चेन्नईत सुरू होणार आहे. ही मालिक विश्व टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे.
टेलीग्राफच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं गेलं आहे, की स्काई आताही हक्क मिळवण्याच्या शर्यतीत पुढे आहे. मागच्या तीन दशकात इंग्लंडच्या बहुतेक दौऱ्याचं प्रसारण स्काईवरचं केलं गेलं आहे. सध्या भारत आणि इंग्लंड दोन्ही संघ फॉर्ममध्ये आहेत. भारतानं ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मैदानात टेस्ट सीरिजमध्ये पराभूत केलं आहे. तर, इंग्लंडदेखील श्रीलंकेला त्यांच्याच मैदानावर हरवून चैन्नईत पोहोचलं आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या 2 टेस्ट मॅचसाठी भारतीय टीम - रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, ऋद्धिमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर आणि अक्षर पटेल.
इंग्लंडची टीम - जो रूट (कर्णधार), जोफ्रा आर्चर, मोइन अली, जेम्स एंडरसन, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, जैक क्राउली, बेन फोक्स, डैन लॉरेंस, जैक लीच, डॉम सिबली, बेन स्टोक्स, ओली स्टोन आणि क्रिस वोक्स.