• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • कशी तयार होते टीम इंडियाची आवडती डिश? पाहा VIDEO

कशी तयार होते टीम इंडियाची आवडती डिश? पाहा VIDEO

भारतीय क्रिकेटपटू (Team India) गेल्या काही दिवसांपाासून मुंबईमधील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहेत. या हॉटेलमधील जिममध्ये सर्वजण रोज घाम गाळत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या आवडती डिश खाण्याची एकही संधी ते सोडत नाहीत.

 • Share this:
  मुंबई, 27 जून : भारतीय क्रिकेट टीम श्रीलंका दौऱ्यासाठी (Team India For Sri Lanka Tour) सोमवारी रवाना होणार आहे. या दौऱ्यापूर्वी भारतीय क्रिकेटपटू गेल्या काही दिवसांपाासून मुंबईमधील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहेत. या हॉटेलमधील जिमममध्ये सर्वजण रोज घाम गाळत आहेत. त्याचबरोबर त्यांची आवडती डिश खाण्याची संधी सोडत नाहीत. बीसीसीआयनं या विषयावरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये टीम इंडियाचे खेळाडू त्यांच्या आवडत्या डिशची माहिती देत आहेत. बीसीसीआयनं खास रविवारच्या सुट्टीचा मूड साधत हा व्हिडीओ शेअर केला आहे. टीम इंडियाच्या आवडत्या डिशचं नाव आहे, 'मॉक डक' (Mock Duck).  श्रीलंका दौऱ्यावरील टीम इंडियाचा कॅप्टन शिखर धवन (Shikhar Dhawan) यानं या व्हिडीओची सुरुवात होते. ही डिश सध्या बनवली जात आहे. ही माझी आवडती डिश असल्याचं तो सांगतो. त्यांनंतर मुंबईतील ग्रँट हयात हॉटेलमधील शेफ या हॉटेलच्या किचनची सहल घडवतात. त्याचबरोबर ही डिश कशी तयार होते याची माहिती देखील देतात. विकेट किपर - बॅट्समन संजू सॅमसनची (Sanju Samson) ही सर्वात आवडती डिश आहे. शिखर धवनला देखील ही डिश आता आवडू लागली आहे.  हार्दिक आणि कृणाल पांड्यानं आठवडाभरात तीन ते चार वेळा या डिशची ऑर्डर केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. https://twitter.com/BCCI/status/1408998525472366598?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1408998525472366598%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-bcci-gave-a-sneak-peek-of-how-team-indias-current-favorite-dish-mock-duck-is-prepared-3635943.html भारताची एक क्रिकेट टीम सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्याचवेळी दुसरी टीम श्रीलंकेला जाणार आहे. वरिष्ठ खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर असल्यानं (India vs England) या टीममध्ये अनेक नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर या टीममध्ये काही सिनियर खेळाडू देखील आहेत. टी20 वर्ल्ड कपपूर्वी (T20 World Cup 2021) निवड समितीला प्रभावित करण्याची त्यांना हा दौरा म्हणजे शेवटची संधी आहे. 'टीममधील सर्वात शांत आणि खोडकर खेळाडू कोण होता?' कपिलनं दिलं उत्तर श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडिया : शिखर धवन (कॅप्टन), भुवनेश्वर कुमार (व्हाईस कॅप्टन), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, नितिश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चहर, कृष्णप्पा गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया नेट बॉलर्स : इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंह, साई किशोर आणि समरजीत सिंह
  Published by:News18 Desk
  First published: