मुंबई, 27 जून: भारतीय क्रिकेट टीमनं 1983 साली पहिल्यांदा वन-डे वर्ल्ड कप (ICC World Cup 1983) जिंकला होता. या ऐतिहासिक घटनेला 25 जून रोजी 38 वर्ष झाली आहेत. त्या दिवशी कपिल देव (Kapil Dev) यांच्या टीमनं वेस्ट इंडिजचा 43 रननं पराभव करत विजेतेपद पटकावले होते. या टीममधील अनेक दिग्गज न्यूज 18 वरील ‘विश्वविजय के बाहुबली’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी वर्ल्ड कपमधील आठवणींना उजाळा दिला. कॅप्टन कपिल देवसह मोहिंदर अमरनाथ, किर्ती आझाद, श्रीकांत, यशपाल शर्मा, सय्यद किरमाणी आणि संदीप पाटीलसह अनेक खेळाडू या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. 83 मधील वर्ल्ड कप विजेतेपदाला आता 38 वर्ष झाली आहेत. या काळात भारतीय क्रिकेटमध्ये मोठा बदल झाला. पण, आजही 83 च्या टीममधील सर्व खेळाडूंना मोठा मान आहे. कपिल देव यांना या कार्यक्रमात सर्वात खोडकर खेळाडू कोण असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर कपिल यांनी ‘कोण नव्हतं?’ असा प्रश्न विचारला. प्रत्येकाची पद्धत वेगळी होती. असे कपिलने सांगितले. त्यानंतर कपिल म्हणाले, “टीममधील सर्वात शांत खेळाडू हा रॉजर बिन्नी (Roger Binny) होता. मी हिंदीमध्ये काय बोलतोय हे त्याला समजणार नाही. पण तो अतिशय शांत आणि सभ्य खेळाडू होता. मी आजवर त्याला कधीही रागवलेलं पाहिलं नाही. तसंच त्याच्या डोक्यात कधी नकारात्मक विचार असल्याचं मला आठवत नाही.” अशी आठवण कपिल यांनी सांगितली. कपिलनं पुढं सांगितलं की, सर्वात खोडकर किर्ती आझाद आणि संदीप पाटील होते. ते आवश्यक देखील होते. जर सर्वच खेळाडू सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर बनले तर अवघड होईल." असे ते म्हणाले. पाकिस्तानी कोचच्या राजीनाम्याचं सत्य उघड, ड्रेसिंग रुममध्ये झाला होता वाद वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या फायनल मॅचमध्ये भारतीय टीमनं पहिल्यांदा बॅटींग करताना फक्त 183 रन काढले होते. त्यावेळी वेस्ट इंडिज टीम ही मॅच आरामात जिंकेल असा सर्वांचा अंदाज होता. मात्र त्यावेळी टीम इंडियानं जिद्दीनं खेळ करत वेस्ट इंडिजचा 43 रननं पराभव केला आणि लॉर्ड्सच्या बाल्कनीत कपिल देव यांनी विश्वविजेपदाचा करंडक उंचावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.