जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / BCCI चा मोठा निर्णय, शिखर धवनचे होणार 4 कोटींचे नुकसान

BCCI चा मोठा निर्णय, शिखर धवनचे होणार 4 कोटींचे नुकसान

BCCI चा मोठा निर्णय, शिखर धवनचे होणार 4 कोटींचे नुकसान

बीसीसीआयने (BCCI) 2021-22 साठी करारबद्ध करण्यात येणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार टीम इंडियाचा ओपनर शिखर धवनचं (Shikhar Dhawan) मोठं नुकसान झालं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 3 मार्च : बीसीसीआयने (BCCI) 2021-22 साठी करारबद्ध करण्यात येणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये मागील वर्षभरात खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचे पडसाद उमटले आहेत. बीसीसीआयच्या वार्षिक करारामध्ये 27 खेळाडूंचा समावेश आहे. नव्या यादीनुसार काही दिग्गज खेळाडूंचा वार्षिक पगार कमी  झाला आहे. यामध्ये टीम इंडियाचा ओपनर शिखर धवनचा (Shikhar Dhawan) समावेश आहे. शिखर धवनचा मागील वर्षी 10 खेळाडूंसह ग्रुप ए मध्ये समावेश होता. यंदा फक्त 5 खेळाडूंचा ए ग्रुपमध्ये समावेश असून त्यामध्ये धवनचे नाव नाही. धवनला बीसीसीआयनं थेट सी ग्रुपमध्ये टाकले आहे. बीसीसीआयच्या या निर्णयानं त्याचं 4 कोटींचं नुकसान होणार आहे. ए ग्रेडमधील खेळाडूंना वार्षिक 5 कोटी तर सी ग्रेडच्या खेळाडूंना वार्षिक 1 कोटी पगार दिला जातो. शिखर धवन बराच काळापासून टेस्ट क्रिकेट खेळलेला नाही. हे त्याच्या डिमोशनचे मुख्य कारण आहे. धवन 2018 साली शेवटची टेस्ट मॅच खेळला होता. त्यानंतर केएल राहुल आणि मयांक अग्रवाल यांचा उदय झाल्यानंतर त्याची टेस्ट टीममधील जागा गेली. त्याला भविष्यात देखील ही संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिज आणि श्रीलंका विरूद्ध झालेल्या टी20 सीरिजमधील भारतीय टीममध्येही त्याचा समावेश नव्हता. मागील वर्षी यूएईमध्ये झालेल्या टी20 वर्ल्ड कपच्या टीममध्येही त्याची निवड करण्यात आली नव्हती. क्रिकेटच्या या सर्वात छोट्या प्रकारातही त्याला पुन्हा भारतीय टीममध्ये संधी मिळण्याची शक्यता अवघड आहे. .या सर्वांचा परिणाम धवनच्या ग्रेडवर झाला आहे. IPL 2022 : जेसन रॉयची जागा घेण्यासाठी 3 खेळाडू सज्ज, T20 मध्ये आहे जबरदस्त रेकॉर्ड पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना ग्रेड बी मध्ये टाकण्यात आलं आहे, हे दोन्ही खेळाडू आधी ग्रेड ए मध्ये होते. तर हार्दिक पांड्याच्या ग्रेडमध्ये मोठी घसरण झाली आहे. ग्रेड ए मधून हार्दिक थेट ग्रेड सी मध्ये गेला आहे. विकेट कीपर बॅटर ऋद्धीमान साहादेखील ग्रेड बी मधून ग्रेड सीमध्ये गेला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात