जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / ऋद्धीमान साहा धमकी प्रकरण BCCI च्या कोर्टात, विशेष समिती करणार चौकशी

ऋद्धीमान साहा धमकी प्रकरण BCCI च्या कोर्टात, विशेष समिती करणार चौकशी

ऋद्धीमान साहा धमकी प्रकरण BCCI च्या कोर्टात, विशेष समिती करणार चौकशी

टीम इंडियाचा विकेट किपर-बॅटर ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आपल्याला मुलाखत देण्यासाठी एका पत्रकारानं धमकी दिल्याचा आरोप साहानं केला होता

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 26 फेब्रुवारी : टीम इंडियाचा विकेट किपर-बॅटर ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आपल्याला मुलाखत देण्यासाठी एका पत्रकारानं धमकी दिल्याचा आरोप साहानं केला होता. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बीसीसीआयनं (BCCI) तीन सदस्यीय विशेष समितीची स्थापना केली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, कोषाध्यक्ष अरूण सिंह धूमळ आणि बोर्डाच्या मुख्य परिषदेचे सदस्य प्रभतेज सिंह भाटीया यांचा या समितीमध्ये समावेश आहे. साहानं काही दिवसांपूर्वी पत्रकारासोबतचे व्हॉट्सअप मेसेजचे स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केले होते. पण, आपल्याला कुणाच्याही कारकिर्दीचे नुकसान करायचं नाही, असं सांगत त्याने ‘त्या’ पत्रकाराचं नाव सांगण्यास नकार दिला होता. आता ताज्या वृत्तानुसार साहा या प्रकरणात पत्रकाराच्या नावाचा खुलासा करण्यास तयार झाला आहे. त्याने या चौकशी समितीच्या तपासाला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. कधी सुरू होणार कारवाई? बीसीसीआयनं याबाबत एक वक्तव्य जारी केलं आहे. यामध्ये तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली असून ही समिती साहाला मिळालेल्या धमक्याची चौकशी पुढील आठवड्यात सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. IND vs SL 2nd T20 : भारताच्या सीरिज जिंकण्याच्या आशेवर पडणार ‘पाणी’! टीम इंडियाच्या काळजीत भर ऋद्धीमान साहानं व्हॉट्सअप स्क्रीन शॉट शेअर करत पत्रकार त्याच्यावर कशा पद्धतीनं दबाव टाकत असल्याचं जाहीर केलं आहे. या स्क्रीनशॉटनुसार तो पत्रकार साहाला म्हणतो की, ‘मला मुलाखत दिलीस तर चांगले होईल. त्यांनी (निवड समिती) फक्त एक विकेट किपर निवडला आहे. तू 11 पत्रकार निवडण्याचा प्रयत्न केलास. माझ्या मते ते बरोबर नाही. तुला जास्त मदत करू शकेल त्याची निवड कर. तू माझा कॉल घेतला नाहीस. मी आता तुझी कधीही मुलाखत घेणार नाही. मी ही गोष्ट लक्षात ठेवेन.’ असं या स्क्रीन शॉटमध्ये त्या पत्रकाराने म्हंटलेलं दिसत होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात