मुंबई, 26 फेब्रुवारी : भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरी टी20 (India vs Sri Lanka 2nd T20) आज (शनिवार) धर्मशालामध्ये होणार आहे. तीन मॅचच्या या सीरिजमधील पहिली लढत टीम इंडियाने मोठ्या फरकानं जिंकली होती. आता दुसरी मॅच जिंकून ही सीरिज आजच जिंकण्याची टीम इंडियाची इच्छा लांबवणीवर पडण्याची शक्यता आहे. धर्मशालामधील हवामानामुळे आजची मॅच होणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. हवामान विभागानं शनिवारी दिवसभर धर्मशालामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मॅचच्या वेळेतही पावसाचा अडथळा कायम राहिल्यास रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कॅप्टनसीमध्ये टीम इंडियाला लिमिटेड ओव्हर्समधील सलग 11 वी मॅच जिंकण्यासाठी प्रतीक्षा करावी लागू शकते. धर्मशालासह संपूर्ण कांगडा जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पाऊस सुरू आहे. शनिवारी संध्याकाळीही पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे ही मॅच होणार का? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. धर्मशालामधील क्रिकेट मॅचच्या दरम्यान पावसाचा अडथळा ही नवी गोष्ट नाही. यापूर्वी 12 मार्च 2020 रोजी भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील मॅच पावसामुळे रद्द करावी लागली होती. या सीरिजमध्ये 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी सलग दोन दिवस भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यात धर्मशालामध्ये मॅच होणार आहे. दोन्ही टीमना धक्का पहिल्या टी-20 मध्ये पराभव झाल्यानंतर पिछाडीवर पडलेल्या श्रीलंकेला (India vs Sri Lanka T20 Series) मोठा धक्का बसला आहे. टीमचा मिस्ट्री स्पिनर महीश तीक्षणा (Maheesh Tikshana) भारताविरुद्धच्या उरलेल्या दोन्ही टी-20 मधून हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. सोबतच कुसल मेंडिसही (Kusal Mendis) दुखापतीमुळे बाहेर आहे. भारताविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी निरोशन डिकवेला आणि धनंजय डि सिल्वा यांना टीममध्ये बोलावण्यात आलं आहे.
IND vs SL Pink Ball Test : पिंक बॉल टेस्टमध्ये प्रेक्षकांना परवानगी, वाचा काय आहे तिकीटांची किंमत
टीम इंडियाचा ओपनर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) दुखापतीमुळे या सीरिजमधून आऊट झाला आहे. त्याच्या जागी मयंक अग्रवालचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.