Home /News /sport /

ऑस्ट्रेलियाचा विजयी वीर नटराजनच्या स्वागताला बग्गी; सेहवागने शेअर केलेला भन्नाट VIDEO पाहाच

ऑस्ट्रेलियाचा विजयी वीर नटराजनच्या स्वागताला बग्गी; सेहवागने शेअर केलेला भन्नाट VIDEO पाहाच

भारतात क्रिकेट हे अगदी टोकाचं वेड आहे आणि ते कानाकोपऱ्यात पोहोचलं आहे. आता पुन्हा एकदा एका अनोख्या VIDEO तून हे वेड समोर आलं आहे.

    मुंबई, 21 जानेवारी : भारतात क्रिकेट (cricket) हा खेळ नसून वेड आहे, तो भारतीयांसाठी एक धर्म आहे. हीच बाब आता एका अनोख्या घटनेनं सिद्ध केली आहे. ऑस्ट्रेलियातून परतलेल्या (IND VS AUS) विजयी वीराच्या स्वागताची तयारी पाहून तुम्हीही हेच म्हणाल. टीम इंडियाचा उमेदीचा, नव्या दमाचा खेळाडू (cricketer) टी नटराजन (T Natrajan) गुरुवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून (Australia cricket match) विजयश्री मिळवत मायदेशी परत आला. तो तामिळनाडूमधील (Tamilnadu) सलेम जिल्ह्यातील चिन्नपमपट्टी गावी पोचला. नटराजन याचं त्याच्या गावात अतिशय जल्लोषात स्वागत झालं. इथं त्याच्यासाठी चक्क घोड्याचा रथ आणला होता. या बग्गीवर त्याला मिरवत-मिरवत घरी नेण्यात आलं. यासगळ्या मिरवणुकीत त्याला शेकडो चाहत्यांनी सतत घेरलेलं होतं. नटराजन या रथावर बसून दिमाखात तिरंगा (Tiranga) फडकावत होता. त्याच्या आसपास लोक ढोल आणि नगारे वाजवत अखेरपर्यंत चालत होते. माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) यानं नटराजन यांच्या या आगमनानंतरचा प्रेक्षणीय व्हिडीओ (viral video) ट्विटरवर (twitter) शेअर केला आहे. याला असंख्य लोकांनी लाईक करत त्यावर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. सेहवागनं या व्हीडिओसोबत लिहिलं आहे, की 'इथं क्रिकेट केवळ खेळ नाही. त्याहून खूप जास्त आहे. नटराजन सलेम जिल्ह्यातील चिन्नपमपट्टी गावी पोचला तेव्हा त्याचं असं जंगी स्वागत करण्यात आलं. काय कमाल कथा आहे!' आयपीएलच्या 13 व्या सीझनमध्ये नटराजन या बॉलरनं अतिशय उत्कुष्ट खेळ केला. त्यासह आताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही त्याला बॉलर म्हणून भारतीय संघात सहभागी करून घेतलं गेलं. इथेही त्यानं अतिशय उत्कृष्ट खेळ केला. केवळ वनडे नाही तर टी-20 आणि टेस्ट मॅचमध्येही (Test match) त्यानं डेब्यू केला. 11 वर्षांचा असल्यापासून नटराजन क्रिकेटमध्ये रस घेतो आहे. आणि आज तो या उंचीवर पोचला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Twiter, Virender sehwag

    पुढील बातम्या