मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

बांगलादेशचा न्यूझीलंडवर पुन्हा विजय, ऑस्ट्रेलियाला बसला मोठा फटका

बांगलादेशचा न्यूझीलंडवर पुन्हा विजय, ऑस्ट्रेलियाला बसला मोठा फटका

न्यूझीलंड विरुद्धच्या पाच मॅचच्या टी 20 सीरिजमध्ये (Bangladesh vs New Zealand, T20I) बांगलादेशनं 2-0 नं आघाडी घेतली आहे. बांगलादेशच्या या विजयाचा मोठा फटका ऑस्ट्रेलियाला बसला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 4 सप्टेंबर : न्यूझीलंड विरुद्धच्या पाच मॅचच्या टी 20 सीरिजमध्ये (Bangladesh vs New Zealand, T20I) बांगलादेशनं 2-0 नं आघाडी घेतली आहे. पहिल्यांदा बॅटींग करताना बांगलादेशनं 20 ओव्हर्समध्ये 6 आऊट 141 रन केले. त्याला उत्तर देताना न्यूझीलंडची टीम 137 रनच करु शकली.  न्यूझीलंडला शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जिंकण्यासाठी 20 रन हवे होते. त्यांचा कॅप्टन टॉम लॅथम  (Tom Latham) क्रिझवर होता तरी तो विजय मिळवून देऊ शकला नाही.

शेरे-बांग्ला स्टेडियमवरील मॅचमध्ये बांगलादेशचा कॅप्टन महमदुल्लाहनं (Mahmudullah ) टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. मोहम्मद नईम आणि लिंटन दास यांनी चांगली सुरुवात केली. या दोघांनी 9.3 ओव्हरमध्ये 59 रन काढले. ही जोडी फुटल्यानंतर बांगलादेशच्या विकेट्स ठराविक अंतरानं पडल्या. पण कॅप्टन महमदुल्लाहनं 32 बॉलमध्ये नाबाद 37 रनची खेळी करत टीमला 141 चा सन्मानजनक स्कोअर गाठून दिला.

स्पिन बॉलिंगला साथ देणाऱ्या पिचवर 142 रन करण्यासाठी न्यूझीलंडला चांगलाच संघर्ष करावा लागला. टॉम लॅथम आणि विल यंग यांनी तिसऱ्या विकेटसाठी 43 रनची पार्टनरशिप करत न्यूझीलंडच्या आशा कायम ठेवल्या. शाकिबनं यंगला आऊट करत ही जोडी फोडली. त्यानंतर हेन्री निकोलस आणि ग्रँडहोम देखील स्वस्तात आऊट झाले.

शेवटच्या ओव्हरचा थरार

न्यूझीलंडला शेवटच्या ओव्हरमध्ये 20 रन हवे होते. मुस्तफिजूर रहमाननं ती ओव्हर टाकली. त्याच्या पहिल्या चार बॉलवर 7 रन निघाले. पाचवा बॉल रहमान नो बॉल टाकला. त्यावर लॅथमनं फोर लगावला. आता न्यूझीलंडला विजयासाठी 2 बॉलमध्ये 8 रन हवे होते. पण पुढील 2 बॉलवर फक्त 3 रन निघाले आणि बांगलादेशनं ही मॅच 4 रननं जिंकली. बांगलादेशचा या मालिकेतील सलग दुसरा विजय आहे.

IND vs ENG: 'ती' आमची चूक झाली..' दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर उमेश यादवनं दिली कबुली

बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंडचा झालेल्या पराभवाचा मोठा फटका ऑस्ट्रेलियाला बसला आहे. आयसीसी टी 20 रँकिंगमध्ये (ICC T20 Ranking) बांगलादेशनं आता सहाव्या क्रमांकवर झेप घेतली असून ऑस्ट्रेलियाला सातव्या क्रमांकावर ढकलले आहे.

First published:

Tags: Australia, Bangladesh cricket team, Cricket news