मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG: 'ती' आमची चूक झाली..' दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर उमेश यादवनं दिली कबुली

IND vs ENG: 'ती' आमची चूक झाली..' दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर उमेश यादवनं दिली कबुली

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या टेस्टमध्ये (India vs England 4th test) यजमान टीमवर वर्चस्व गाजवण्याची संधी टीम इंडियानं गमावली.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या टेस्टमध्ये (India vs England 4th test) यजमान टीमवर वर्चस्व गाजवण्याची संधी टीम इंडियानं गमावली.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या टेस्टमध्ये (India vs England 4th test) यजमान टीमवर वर्चस्व गाजवण्याची संधी टीम इंडियानं गमावली.

ओव्हल, 4 सप्टेंबर : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या टेस्टमध्ये (India vs England 4th test) यजमान टीमवर वर्चस्व गाजवण्याची संधी टीम इंडियानं गमावली. भारतीय टीमच्या 191 रनला उत्तर देताना इंग्लंडची अवस्था 5 आऊट 62 अशी झाली होती. त्यानंतर इंग्लडच्या लोअर ऑर्डरनं प्रतिकार करत 290 पर्यंत मजल मारली. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या इनिंगमध्ये 99 रनची आघाडी मिळाली. भारताचा फास्ट बॉलर उमेश यादव (Umesh Yadav) यानं दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर टीम इंडियानं केलेल्या चुकीची कबुली दिली आहे.

'पहिल्या 40 मिनिटामध्ये आम्ही दोन विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे आमचं वर्चस्व होतं. पण नंतरच्या सात ते आठ ओव्हरमध्ये आम्ही 40-45 रन दिले. त्यामुळे इंग्लंडच्या बॅट्समन्सना लय सापडली. काय करता येऊ शकतं याचा त्यांना अंदाज आला. पिचचा सपोर्ट मिळत नसेल तर तुम्ही विकेट घेण्यासाठी सर्व प्रकारचे उपाय करता. त्यावेळी बॉलर्सनी रन दिले. त्यामुळे बॅट्समन्सला वर्चस्व गाजवण्याची संधी मिळाली,' असं उमेशनं सांगितलं.

'माझ्या मते आम्ही काही चुका केल्या. आम्ही ज्या पद्धतीनं विकेट्स घेतल्या होत्या ते पाहाता त्यांच्यावर दबाव कायम ठेवायला हवा होता. पण आम्ही मधल्या टप्प्यात रन दिले. ते व्हायला नको होतं.' अशी कबुली उमेशनं दिली आहे.

टीम इंडियाला अखेरच्या 5 विकेट घेण्यात भारतीय टीमला संघर्ष करावा लागला, याचसह भारतीय बॉलर्सनी रनही जास्त दिल्या. इंग्लंडकडून ओली पोपने (Ollie Pope) सर्वाधिक 81 रन केले, तर जॉनी बेयरस्टोने (Jonny Bairstow) 37 आणि मोईन अलीने (Moeen Ali) 35 रनची खेळी केली. नवव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या क्रिस वोक्सने (Chris Woakes) 50 रन केले.

IND vs ENG: टीम इंडियाला मॅच जिंकण्यासाठी हवी किमान 'इतकी' आघाडी!

भारताकडून उमेश यादवने (Umesh Yadav) सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजाला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

First published:

Tags: Cricket news, India vs england, Umesh yadav