मुंबई, 17 जून : बांगलादेशची क्रिकेट टीम सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्ट क्रिकेट मॅचमध्ये बांगलादेशची (West Indies Vs Bangladesh Test Match) सुरुवात खूपच खराब झाली आहे. यजमान वेस्ट इंडिजने बांगलादेशला पहिल्या डावात अवघ्या 103 धावांत गुंडाळलंय. वेस्ट इंडिजच्या बॉलर्सच्या माऱ्यासमोर बांगलादेशचे 6 बॅटरही खातंही उघडू शकलेले नाहीत, यावरूनच त्यांच्या खराब बॅटिंगचा (Batting) अंदाज लावला जाऊ शकतो. या अवघड परिस्थितीमध्ये बांगलादेशचा कॅप्टन शाकिब अल हसननं (Shakib Al Hasan) एकाकी लढत दिली. त्याच्या प्रतिकारामुळेच बांगलादेशला 100 चा टप्पा ओलांडता आला. शाकिबने 67 बॉलमध्ये 51 रन्सची खेळी केली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजनं 2 95 रन्स केले होते. कॅप्टन क्रेग ब्रॅथवेट (Captain Craig Brathwaite) 42 आणि निकृमा बोनर 12 धावांवर खेळत आहेत. बांगलादेशकडून मुस्तफिजुर रहमान आणि इबादत हुसेन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. नॉर्थ साऊंडमध्ये यजमान वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यातील टेस्ट मॅच खेळली जात आहे. वेस्ट इंडिजचा कॅप्टन क्रेग ब्रॅथवेटने नाणेफेक जिंकून आधी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. कॅरेबियन बॉलर्सनी अप्रतिम बॉलिंग करत आपल्या कॅप्टनचा बॉलिंगचा निर्णय 100 टक्के योग्य असल्याचे सिद्ध केले आणि बांगलादेशच्या बॅट्समनना रन्स काढू दिल्या नाहीत. ओपनर महमुदुल हसन जॉय, तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेला नजमुल हुसेन आणि चौथ्या क्रमांकावर आलेला बॅट्समन मोमिनुल हक यांना तर, खातंही उघडता आलं नाही. बांगलादेशचे फक्त तीन ब दोन अंकी धावसंख्येला स्पर्श करू शकले. ओपनर तमीम इक्बालने 29 रन्स केले, तर लिटन दास 12 रन करून आऊट झाला. या दोघांशिवाय फक्त शाकिब अल हसनलाच रन्सचा दुहेरी आकडा गाठता आला. त्याने सहा चौकार आणि एका सिक्सरच्या मदतीने 51 धावा केल्या. मेहदी हसन 2 रन काढून बाद झाला. तर, इबादत हुसेन तीन धावांवर नॉट आऊट राहिला. नूरुल हसन, मुस्तफिजुर रहमान आणि खालिद अहमद खातं न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा विश्वविक्रम, वनडेमध्ये ठोकली ट्रिपल सेंच्युरी, VIDEO बांगलादेशला ऑलआउट करण्यासाठी वेस्ट इंडिजच्या बॉलर्सना केवळ 32.5 ओव्हर बॉलिंग करावी लागली. यजमानांकडून अल्झारी जोसेफ आणि जेडेन सील्स यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर, केमार रोच आणि काईल मेयर्सने 2-2 विकेट घेतल्या. विशेष म्हणजे या चारही बॉलर्सनी प्रत्येकी 2-2 ओव्हर मेडन टाकल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.