मुंबई, 16 जून : ऑस्ट्रेलियाच्या नेत्रहीन क्रिकेट टीमचा ओपनर स्टीफन नीरोने (Steffan Nero) वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यात ट्रिपल सेंच्युरी ठोकत इतिहास घडवला आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातल्या 3 वनडे मॅचच्या सीरिजच्या पहिल्या सामन्यात स्टीफनने ही खेळी केली. नीरोने त्याच्या या खेळीमध्ये 49 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने फक्त 140 बॉलमध्ये 309 नाबाद रन केले. स्टीफन नीरोच्या या मॅरेथॉन इनिंगमुळे ऑस्ट्रेलियाने निर्धारित 40 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 541 रन केले. नेत्रहीन वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यामधला कोणत्याही टीमचा हा सर्वाधिक स्कोअर आहे. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाची सुरूवात खराब झाली होती, कारण टीमने 20 रनवरच पहिली विकेट गमावली होती.
A TRIPLE century! Steffan Nero finishes 309* (140) in the Australian Blind Cricket Team's first ODI against New Zealand 🇦🇺
— Cricket Australia (@CricketAus) June 14, 2022
That's his third consecutive century at the #ICIS22 after scores of 113 (46) and 101* (47) earlier this week 👏 https://t.co/MDTiUnAC1S | #ASportForAll pic.twitter.com/cqv9vBEPW3
स्टीफन नीरोने मायकल जॅनिससोबत दुसऱ्या विकेटसाठी 266 रनची पार्टनरशीप केली. मॅट कॅमरून आणि नेड ब्ररुयर यांनीही अर्धशतकं केली. या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या न्यूझीलंडचा 272 रनवर ऑल आऊट झाला, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना 269 रनने जिंकला. स्टीफन नीरोची हा स्कोअर नेत्रहीन वनडे आंतरराष्ट्रीयमधला सर्वाधिक स्कोअर आहे. याआधी पाकिस्तानच्या मसूद जानने 1998 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दिल्लीमध्ये 262 रन केले होते. स्टीफन नीरो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या मॅचमध्ये केलेल्या ट्रिपल सेंच्युरी आधी त्याने दोन सामन्यांमध्ये 113 आणि 101 रनची नाबाद खेळी केली होती.