ढाका, 27 मे : बांगलादेशचा विकेट किपर - बॅट्समन मुशफिकुर रहीम (Mushfiqur Rahim) पुन्हा एकदा वादग्रस्त वागणुकीमुळे चर्चेत आला आहे. बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या दुसऱ्या वन-डे मध्ये त्याने सहकाऱ्याला सल्ला दिल्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral) झाला आहे. रहिमनं बांगलादेशची फिल्डिंग सुरु असताना विकेट किपर म्हणून हा सल्ला दिला होता. या मॅचमध्ये रहिमच्या 125 रनाच्या जोरावर बांगलादेशने श्रीलंकेचा डकवर्थ लुईस पद्धतीने 103 रननी मोठा पराभव केला. या विजयासह बांगलादेशनं 3 वन-डे च्या मालिकेत श्रीलंकेवर 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
काय घडला प्रसंग?
बांगलादेशने दुसऱ्या वन-डेमध्ये रहीमच्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेसमोर विजयासाठी 247 रनचे आव्हान ठेवले होते. श्रीलंकेची टीम या टार्गेटचा पाठलाग करत असताना 11 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. बांगलादेशचा हसन मिराज त्यावेळी बॉलिंग टाकत होता. त्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर श्रीलंकेच्या गुनतिलका याने एक बचावात्मक शॉट मारला. नॉन स्ट्रायकरला असलेल्या निसंकाला रन हवा होता. मात्र, मिराजने डाइव्ह लगावत बॉल पकडला. यावेळी रहीमने 'तो तुझ्या समोर आला तर धक्का मारुन जमिनीवर पाड' असा बांगला भाषेत सल्ला दिला. रहिमचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
#BanvSl pic.twitter.com/W6VNRQGZun
— Rahul ® (@RahulSadhu009) May 26, 2021
बांगलादेशच्या बॉलर्सनी दुसऱ्या वन-डेमध्ये जोरदार कामगिरी करत श्रीलंकेला 40 ओव्हर्समध्ये नऊ आऊट 141 रनवर रोखले. पहिल्या वन-डे मध्ये चार विकेट्स घेणारा ऑफ स्पिनर मेहदी हसन (Mehidy Hasan) याने दुसऱ्या वन-डे मध्ये देखील चांगली बॉलिंग केली. हसनने 10 ओव्हर्समध्ये 28 रन देत तीन विकेट्स घेतल्या.
ODI Bowling Ranking : बांगलादेशच्या 'या' बॉलरने बुमराहाला टाकले मागे
मुस्तफिजुर रहमानने सहा ओव्हर्समध्ये 16 रन देऊन 3 तर शाकिब अल हसनने 2 विकेट्स घेत हसनला चांगली साथ दिली. शरीफुल इस्लामला एक विकेट मिळाली. बांगलादेशने पहिल्यांदाच श्रीलंकेविरुद्ध वन-डे मालिका जिंकली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bangladesh cricket team, Cricket, Sri lanka, Video