Home /News /sport /

बांगलादेशचा मुशफिकुर रहीम पुन्हा सहकाऱ्यावर धावून गेला, पाहा VIDEO

बांगलादेशचा मुशफिकुर रहीम पुन्हा सहकाऱ्यावर धावून गेला, पाहा VIDEO

बांगलादेशचा क्रिकेटपटू मुशफिकुर रहीम (Mushfiqur Rahim) हा त्याच्या मैदानातल्या वादग्रस्त वागणुकीमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. टीमचा सहकारी नसुम अहमदसोबत मैदानात गैरवर्तन केल्यानंतर आता मुशफिकुरचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पुढे वाचा ...
    ढाका, 17 डिसेंबर : बांगलादेशचा क्रिकेटपटू मुशफिकुर रहीम (Mushfiqur Rahim) हा त्याच्या मैदानातल्या वादग्रस्त वागणुकीमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. टीमचा सहकारी नसुम अहमदसोबत मैदानात गैरवर्तन केल्यानंतर आता मुशफिकुरचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मुशफिकुर आपल्याच टीममधल्या खेळाडूच्या अंगावर धावून जात असल्याचं दिसत आहे. बांगाबंधू टी-20 कपमध्ये बेक्सिमिको ढाका आणि फॉर्च्युन बारिशाल यांच्यातल्या मॅचदरम्यानचा हा व्हिडिओ आहे. यावेळीही नसुम अहमदच्याच अंगावर मुशफिकुर धावून गेला होता. मॅचची 13वी ओव्हर नसुम टाकत होता, तेव्हा बॅट्समनने लेग साईडच्या दिशेने बॉल मारला. यानंतर बॉल पकडण्यासाठी नसुम आणि मुशफिकुर दोघंही धावले, पण बॉल पकडल्यानंतर मुशफिकुरने नसुमच्या अंगावर जायचा प्रयत्न केला. याआधीच्या व्हिडिओमध्येही मुशफिकुर नसुमलाच मारायला धावला होता. कॅच पकडण्यासाठी मुशफिकुर आणि नसुम धावले होते. हा कॅच पकडताना दोघंही एकमेकांना आपटणार होते, पण अखेर मुशफिकुरने कॅच पकडला, यानंतर तो नसुमला मारायला गेला. टीममधल्या इतर सहकाऱ्यांनी त्याला रोखलं. या प्रकारानंतर मुशफिकुर रहिमने चाहत्यांची माफी मागितली आहे. 'मॅचनंतर मी नसुमची माफी मागितली आहे, तसंच अल्लाहचीही मी माफी मागतो. मी एक माणूस आहे, हे मी कायमच लक्षात ठेवतो. मी ज्या पद्धतीने वागलो ते स्वीकार केलं जाऊ शकत नाही,' असं रहीम त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टवर म्हणाला. यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने मुशफिकुरचं 25 टक्के मानधन कापलं.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या