जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : टीम इंडियाच्या खेळाडूंचा 'हबीबो' गाण्यावर दमदार डान्स Video Viral

IPL 2022 : टीम इंडियाच्या खेळाडूंचा 'हबीबो' गाण्यावर दमदार डान्स Video Viral

IPL 2022 : टीम इंडियाच्या खेळाडूंचा 'हबीबो' गाण्यावर दमदार डान्स Video Viral

आयपीएल स्पर्धेतील नवी टीम लखनऊ सुपर जायंट्समधील (Lucknow Super Giants) फास्ट बॉलर आवेश खानचा (Avesh Khan) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 मार्च : आयपीएल स्पर्धेतील नवी टीम लखनऊ सुपर जायंट्समधील (Lucknow Super Giants) फास्ट बॉलर आवेश खानचा (Avesh Khan) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) ओपनिंग बॅटर व्यंकटेश अय्यरसोबत  (Venkatesh Iyer)  ‘कुथु-हलामिथी हबीबो’ या अरबी ट्यूनवर डान्स करत आहे. आवेशनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. आवेश आणि अय्यर यांनी या व्हिडीओमध्ये जोरदार डान्स केला आहे. 23 सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यावर क्रिकेट फॅन्सनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) बॅटर सूर्यकुमार यादवनंही (Suryakumar Yadav) या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली असून अनेक इमोजी शेअर केले आहेत.

जाहिरात

आवेशनं या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हंटलं आहे की, ‘सर्वात हॉट ट्रेंडवर प्रयत्न केला आहे. अरबी कुथु हबीबो’ हा व्हिडीओ इशान किशन आणि हरप्रीत बरारच्या मदतीनं तयार केला असल्याचंही त्यानं सांगितलंय. मध्य प्रदेशचा फास्ट बॉलर असलेला आवेश यंदाच्या ऑक्शनमध्ये लखनऊनं 10 कोटी रूपयांमध्ये खरेदी केले आहे. तो आजवरच्या आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप खेळाडू बनला. IND vs AUS : वर्ल्ड कपवर मितालीचंच ‘राज’, दमदार कमबॅकसह केला नवा रेकॉर्ड गेल्या वर्षी न्यूझीलंड विरूद्धच्या टी20 सीरिजमध्ये पदार्पण करणारा व्यंकटेश अय्यर देखील मध्य प्रदेशचा खेळाडू आहे. त्याने आयपीएलमध्ये एकूण 10 मॅच खेळल्या आहेत. त्यामध्ये 4 अर्धशतकासह 370 रन केले आहेत. तर आवेश खाननं 25 आयपीएल मॅचमध्ये 29 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं याचवर्षी वेस्ट इंडिज विरूद्ध कोलकातामध्ये झालेल्या टी20 मॅचमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात