मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

PSL : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा PCB वर गंभीर आरोप, हॉटेलमध्ये केले धक्कादायक वर्तन

PSL : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा PCB वर गंभीर आरोप, हॉटेलमध्ये केले धक्कादायक वर्तन

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर जेम्स फॉकनर ( James Faulkner) पैसे न मिळाल्यानं पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा (PSL 2022) अर्धवट सोडून मायदेशी परतला आहे.

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर जेम्स फॉकनर ( James Faulkner) पैसे न मिळाल्यानं पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा (PSL 2022) अर्धवट सोडून मायदेशी परतला आहे.

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर जेम्स फॉकनर ( James Faulkner) पैसे न मिळाल्यानं पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा (PSL 2022) अर्धवट सोडून मायदेशी परतला आहे.

    मुंबई, 20 फेब्रुवारी : ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर जेम्स फॉकनर ( James Faulkner) पैसे न मिळाल्यानं पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा (PSL 2022) अर्धवट सोडून मायदेशी परतला आहे. त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर  (Pakistan Cricket Board)  कराराचे पालन केले नाही तसंच पैसे देण्याबाबत सतत खोटं बोलण्याचा आरोप केला आहे. फॉकर क्वेटा ग्लेडिएटर्स  (Quetta Gladiators) टीमचा सदस्य होता. तो मागील 3 मॅच खेळलाही नव्हता. त्याच्या या व्यवहारानं पीसीबी नाराज झाले असून त्यांनी फॉकनरवर पीएसएलमध्ये खेळण्यास बंदी घातली आहे. इतकंच नाही, तर पीसीबीनं ऑस्ट्रेलियन बॉलरवर इमिग्रेशन अधिकाऱ्यांसोबत गैरवर्तन केल्याचा आणि त्याच्या टीमला कमी लेखल्याचाही आरोप केला आहे. 'क्रिकइन्फो' च्या वृत्तानुसार फॉकनर पैशांच्या मुद्यावर अनेक दिवसांपासून नाराज होता. त्याची या विषयावर पीसीबी अधिकाऱ्यांशी सतत चर्चा सुरू होती. पण, शुक्रवारी पीसीबी आणि त्याच्यामधील वाद चांगलाच चिघळला. त्यानंतर फॉकनरनं हॉटेलच्या लॉबीतून बॅट आणि हेल्मेट फेकून दिले. त्यामुळे हॉटेलमधील झुंबराचे नुकसान झाले. विमानतळावर रवाना होण्यापूर्वी त्याने हॉटेलला याबाबतची नुकसान भरपाई दिली आहे. फॉकनरचे आरोप फॉकनरनं पाकिस्तान क्रिकेट फॅन्सची माफी मागत दोन ट्विट पोस्ट केले आहेत. यामध्ये त्याने पीसीबीनं आपला अपमान केल्याचा आरोप केला आहे. फॉकनरनं या ट्विटमध्ये लिहलं आहे की, 'मी पाकिस्तान क्रिकेट फॅन्सची माफी मागतो. पण, दुर्दैवाने पीसीबीनं माझ्या पेमेंट कॉन्ट्रॅक्टचे पालन केले नाही. त्यामुळे मला पाकिस्तान सुपर लीगमधील शेवटच्या 2 मॅचमधून बाहेर पडावे लागत आहे. मी लीग अर्धवट सोडून जात असल्याबद्दल दु:खी आहे. पण, ते सतत माझ्याशी खोटं बोलत होते. पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरू व्हावं यासाठी मदत करण्याची माझी इच्छा होती. इथं चांगली तरूण गुणवत्ता आहे. क्रिकेटवर प्रेम करणारे फॅन्स आहे. पण, पीसीबीनं माझ्याशी जे वर्तन केले, ते खरोखर अपमानास्पद होते. तुम्ही माझी परिस्थिती समजून घ्याल, अशी आशा आहे.' फॉकनरनं ट्विट केल्यानंतर पीसीबीनं क्वेटा ग्लेडिएटर्ससोबत एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यांनी फॉकनचे सर्व आरोप निराधार असल्याचा दावा केला आहे. तसंच त्याच्या निंदनीय व्यवहाराबाबत निराशा व्यक्त केली आहे. फॉकनरच्या एजंटनं यंदा पेमेंटसाठी ब्रिटनमधील बँक अकाऊंटची डिटेल्स दिली होती. त्यापूर्वीच पीसीबीनं त्याची 70 टक्के रक्कम जुन्या खात्यावर पाठवली होती. IND vs SL : IPL मध्ये संधी न मिळालेल्या खेळाडूचं 5 दिवसांमध्ये बदललं नशीब, थेट टीम इंडियात निवड फॉकनर सुरूवातीला केलेले पेमेंट परत करत नाही, तोपर्यंत त्याच्या दुसऱ्या खात्यामध्ये पैसे पाठवले जाणार नाहीत, असे पीसीबीने त्याला कळवले होते,' असा दावा क्रिकइन्फोच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. तर ऑस्ट्रेलियन खेळाडूला पैसे देण्याच्या वादाचा संबंध पीसीबीशी आहे, असं सांगत त्याच्या क्वेटाच्या टीमनं या प्रकरणातून हात झटकले आहेत. फॉकनरनं या सिझनमध्ये क्वेटाकडून 6 मॅच खेळल्या. यामध्ये त्याने 6 विकेट्स घेतल्या तसंच 49 रन केले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Australia, Cricket news, Pakistan Cricket Board

    पुढील बातम्या