मुंबई, 20 फेब्रुवारी : भारत विरूद्ध श्रीलंका टेस्ट सीरिजसाठी (India vs Sri Lanka Test Series) 18 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा झाली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) वन-डे आणि टी20 नंतर टेस्ट टीमचाही कॅप्टन असेल. निवड समितीनं या टीममध्ये पहिल्यांदाच डावखुरा स्पिनर सौरभ कुमारची (Saurabh Kumar) निवड केली आहे. तो यापूर्वी भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील टेस्ट सीरिजमध्ये स्टँडबाय खेळाडू होता. सौरभ कुमार उत्तर प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. देशांतर्गत क्रिकेटमधील दमदार कामगिरीमुळे त्याची निवड करण्यात आली आहे. त्याचे वडील आकाशवाणीमध्ये काम करत होते. आता निवृत्त झाले आहेत. सौरभच्या आजवरच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. मुलानं क्रिकेटपटू व्हावं अशी त्यांची इच्छा होती. सौरभ कुमार त्याच्या वडिलांसोबत उत्तर प्रदेशातील बागपतहून दिल्लीला क्रिकेट प्रशिक्षणासाठी रेल्वेनं जात असे. ‘आम्हाला दिल्लीला जाण्यासाठी अडीत तास लागत. मी आठवड्यातून तीन वेळा सुनीता शर्मा अकदामीमध्ये प्रशिक्षणासाठी जात असे. माझ्यासोबत दिल्लीला येता यावं म्हणून वडिल ओव्हरटाईम करत,’ अशी प्रतिक्रिया सौरभने ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना दिली आहे. सौरभची कारकिर्द सौरभनं आजवर 46 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 196 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने एका इनिंगमध्ये पाच विकेट्स 16 वेळा तर एका मॅचमध्ये 10 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स 6 वेळा घेतल्या आहेत. ‘मी कॅरम बॉल टाकत नाही. बॅटरला जाळ्यात अडकवण्यासाठी बॉलला हवेत फ्लाईट देतो,’ असे सौरभने सांगितले आहे. सौरभ लोअर ऑर्डरमधील उपयुक्त बॅटर देखील असून त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 2 शतकांसह 1572 रन केले आहेत. आयपीएलमध्ये निराशा सौरभ यापूर्वी रायझिंग पुणे सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज या टीमचा सदस्य होता. यंदाच्या आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये त्याची निराशा झाली. एकाही टीमनं त्याला खरेदी करण्यात रस दाखवला नाही. मेगा ऑक्शननंतर पाच दिवसांनीच त्याचं नशीब बदललं. आता त्याची थेट टीम इंडियाच्या टेस्ट टीममध्ये निवड झाली आहे. टीम इंडियात निवड न झाल्यानं ऋद्धीमान साहा संतापला, गांगुली आणि द्रविडवर केली टीका श्रीलंका विरूद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडिया रोहित शर्मा (कॅप्टन), प्रियांक पांचाल, मयांक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत, केएस भरत, रविंद्र जडेजा, जयंत यादव, आर. अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (व्हाईस कॅप्टन), उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि सौरभ कुमार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.