Home /News /sport /

रमेश पोवार कोच झाल्यानंतर कॅप्टन मिताली राजची पहिली प्रतिक्रिया, वाचून वाटेल अभिमान

रमेश पोवार कोच झाल्यानंतर कॅप्टन मिताली राजची पहिली प्रतिक्रिया, वाचून वाटेल अभिमान

रमेश पोवार (Ramesh Powar) यांना यापूर्वी 2018 साली झालेल्या टी20 वर्ल्ड कपनंतर पोवार यांना मिताली राज (Mithali Raj) बरोबर झालेल्या वादामुळे राजीनामा द्यावा लागला होता.

    मुंबई, 27 मे:  रमेश पोवार (Ramesh Powar) यांची भारतीय महिला क्रिकेट टीमचे (Indian Women Cricket Team) कोच म्हणून दुसऱ्यांदा नियुक्ती झाली आहे. यापूर्वी 2018 साली झालेल्या टी20 वर्ल्ड कपनंतर पोवार यांना मिताली राज (Mithalai Raj) बरोबर झालेल्या वादामुळे राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे आता तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा कोच म्हणून परतलेल्या पोवारसोबत मिताली राज जुळवून घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रश्नावर वन-डे आणि टेस्ट टीमची कॅप्टन मिताली राजनं सर्वांचं मन जिंकणारी प्रतिक्रिया दिली आहे. मिताली राजने 'द हिंदू' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये यापूर्वीचे सर्व वाद विसरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. "यापूर्वी घडलेल्या घटना हा भूतकाळ आहे. आता आपण मागे जाऊ शकत नाही. रमेश पोवार यांच्याकडे नक्कीच काही योजना असतील. आम्ही दोघे मिळून टीमचं जहाज पुढे नेणार आहोत. आम्ही एकत्र काम करु आणि भविष्यातील मजबूत टीम तयार करु, कारण पुढच्या वर्षी वर्ल्ड कप देखील आहे.' असे मितालीने सांगितले. इंग्लंड दौऱ्यासाठी योजना भारतीय महिला टीम जूनमध्ये इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात टेस्ट मॅचने होईल. महिला टीम 7 वर्षांनी टेस्ट मॅच खेळणार आहे. या मॅचसाठी कॅप्टन मिताली सज्ज आहे. "सर्व तरुण क्रिकेटर्स आणि माझ्यासाठी देखील या मॅचमध्ये कोणताही दबाव नसेल. आम्ही खूप दिवसांनी टेस्ट मॅच खेळत आहोत. त्याममुळे कोणताही दबाव न घेता प्रदर्शन करणार आहोत." असे मिताली म्हणाली. 'रोहितसारखं करु नकोस,' इंग्लंड दौऱ्यापूर्वी ऋषभ पंतला कपिल देव यांचा सल्ला भारतीय टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पिंक बॉल टेस्ट देखील खेळणार आहे. मितालीने त्यावर आनंद व्यक्त केला आहे. 'आम्ही ऑस्ट्रेलियात डे-नाईट टेस्ट खेळणार आहोत ही चांगली बाब आहे. महिला क्रिकेट टीमला सातत्याने टेस्ट मॅच खेळण्याची संधी मिळाली पाहिजे.' असे मत मितालीने व्यक्त केले आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Mithali raj

    पुढील बातम्या