जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 'डोनट'वाली Love Story! मिस्टर आणि मिसेस स्टार्कचा रोमान्स कॅमेऱ्यात कैद, Cute Video Viral

'डोनट'वाली Love Story! मिस्टर आणि मिसेस स्टार्कचा रोमान्स कॅमेऱ्यात कैद, Cute Video Viral

'डोनट'वाली Love Story! मिस्टर आणि मिसेस स्टार्कचा रोमान्स कॅमेऱ्यात कैद, Cute Video Viral

मिचेल स्टार्क (Mitchell Starc) आणि एलिसा हिली (Alyssa Healy) या ऑस्ट्रेलिन क्रिकेटपटूंमधील खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 जानेवारी : ऑस्ट्रेलिया विरूद्ध इंग्लंड  (Australia vs England) यांच्यातील महिला अ‍ॅशेस सीरिजमधील (Women’s Ashes Series) एकमेव टेस्ट झाली. ही टेस्ट अगदी रंगतदार अवस्थेत ड्रॉ झाली. टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं इंग्लंडला विजयासाठी 257 रनचं लक्ष्य दिलं होते. इंग्लंडने 9 आऊट 245 रन केले. दोन्ही टीमनं शेवटच्या दिवशी जोरदार खेळ केला. या अटीतटीच्या मॅचच्या दरम्यान एका जोडप्याचा रोमान्स कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मिचेल स्टार्क (Mitchell Starc) आणि एलिसा हिली (Alyssa Healy) या ऑस्ट्रेलिन क्रिकेटपटूंमधील खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाले. मिचेल स्टार्कची पत्नी एलिसा ही ऑस्ट्रेलियाच्या महिला टीममधील आक्रमक बॅटर आहे. एक दिवसापूर्वीच स्टार्क आणि हिली या दोघांनाही वर्षातील सर्वश्रेष्ठ वन-डे खेळाडू म्हणून आपआपल्या गटातील पुरस्कार जाहीर झाला आहे. अ‍ॅशेस टेस्टच्या दरम्यानचा या जोडप्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. दोघंही इतरांपेक्षा दूर मागे बसून एकत्र डोनट खात आहेत. तसंच त्यांच्यात काही तरी हास्य विनोद सुरू आहेत.

जाहिरात

हिलीनं स्टार्कला डोनेट ऑफर केलं. स्टार्कनं ते डोनेट अर्ध खाल्लं आणि उर्वरित त्याच्या पत्नीला दिलं. हा सुंदर व्हिडीओ क्रिकेट फॅन्समध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे. मिचेल स्टार्कला (Mitchell Starc) क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा प्रतिष्ठेचा अ‍ॅलन बॉर्डर पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणारा तो पाचवा फास्ट बॉलर आहे. या पुरस्कारासाठी स्टार्क आणि मिचेल मार्श यांच्यात जोरदार चुरस होती. त्यामध्ये अखेर स्टार्कनं बाजी मारली. IPL 2022 : U19 वर्ल्ड कप टीममधील ‘या’ खेळाडूवर लागणार मोठी बोली, अश्विनचे भविष्य मतदानाच्या आधारावर या पुरस्कार विजेत्या खेळाडूची निवड करण्यात येते. यामध्ये स्टार्कला 107 तर मार्शला 106 मत मिळाली.स्टार्कच्या पूर्वी ग्लेन मॅकग्रा, ब्रेट ली, मिचेल जॉन्सन आणि सध्याचा कॅप्टन पॅट कमिन्स या फास्ट बॉलर्सनी हा पुरस्कार पटकावला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात