Home /News /sport /

Ashes Series : इंग्लंडनं केला 0,0,0,0,0...चा नकोसा रेकॉर्ड

Ashes Series : इंग्लंडनं केला 0,0,0,0,0...चा नकोसा रेकॉर्ड

इंग्लंडची टीम सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियात 5 टेस्टची अ‍ॅशेस सीरिज (Ashes Series) खेळली जात आहे. या सीरिजमधील तिसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडनं नकोसा रेकॉर्ड केला आहे.

    मेलबर्न, 26 डिसेंबर : इंग्लंडची टीम सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियात 5 टेस्टची अ‍ॅशेस सीरिज (Ashes Series) खेळली जात आहे. या सीरिजमधील तिसरी टेस्ट मेलबर्नमध्ये रविवारी सुरू झाली. यजमान ऑस्ट्रेलिया या सीरिजमध्ये 2-0 नं आघाडीवर आहे. तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी देखील ऑस्ट्रेलियन बॉलर्सनं दमदार कामगिरी करत इंग्लंडला 185 वर ऑल आऊट केले. इंग्लंडचा ओपनर हसीब हमीद पहिल्या इनिंगमध्ये शून्यावर आऊट झाला. त्याचबरोबर इंग्लंडनं एक खराब रेकॉर्ड नोंदवला आहे. 2021 या कॅलेंडर वर्षात इंग्लंडचे 50 बॅटर्स शून्यावर आऊट झाले आहेत. अन्य सर्व टीमपेक्षा इंग्लंड यामध्ये पुढे आहे. यापूर्वी 1998 साली इंग्लंडचे बॅटर्स सर्वाधिक 54 वेळा शून्यावर आऊट झाले होते. त्यानंतर त्यांनी पून्हा एकदा याबाबतीमध्ये अर्धशतक झळकावले आहे. इंग्लंडकडून कॅप्टन जो रूटने (Joe Root) सर्वाधिक 50 रन केले. मिचेल स्टार्कनं त्याला आऊट केले. यावर्षी फॉर्मात असलेला रूट आऊट झाल्यानंतर इंग्लंडचे अन्य बॅटर्स फार प्रतिकार करू शकले नाहीत. बेन स्टोक्स आणि जोस बटलर पुन्हा एकदा मोठा स्कोअर करण्यात अपयशी ठरले. तर या सीरिजमध्ये पहिल्यांदा खेळणाऱ्या जॉनी बेअरस्टोनं थोडा प्रतिकार करत 35 रन काढले. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर मिचेल स्टार्कनं 2 विकेट्स घेतल्या. स्कॉट बोलंड आणि कॅमेरून ग्रीन यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. इंग्लंडचे बॅटर्स या सीरिजमध्ये पूर्ण फेल गेले आहेत. त्यांना पाच इनिंगमध्ये एकदाही 300 चा टप्पा ओलंडता आलेला नाही. त्यांनी 5 इनिंगमध्ये अनुक्रमे 147, 297, 236, 192 आणि 185 रन केले आहेत. Ashes Series : इंग्लंडची पुन्हा निराशा, पहिली इनिंग झटपट संपुष्टात ऑस्ट्रेलियानं ही टेस्ट जिंकली तर अ‍ॅशेस सीरिज त्यांच्या ताब्यात येईल. तर दुसरिकडं इंग्लंडनं ही टेस्ट गमावल्यास त्यांचा या वर्षातील 9 वा पराभव असेल. तसं झालं तर ही टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील इंग्लंडची सर्वात खराब कामगिरी असेल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ashes, Australia, Cricket, England

    पुढील बातम्या