मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ashes Series: इंग्लंडच्या कॅप्टनचं ऑस्ट्रेलियाला चोख उत्तर, 19 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला

Ashes Series: इंग्लंडच्या कॅप्टनचं ऑस्ट्रेलियाला चोख उत्तर, 19 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील अ‍ॅशेस सीरिजमधील (Ashes Series) पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडने यजमान टीमला चोख उत्तर दिले आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील अ‍ॅशेस सीरिजमधील (Ashes Series) पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडने यजमान टीमला चोख उत्तर दिले आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील अ‍ॅशेस सीरिजमधील (Ashes Series) पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडने यजमान टीमला चोख उत्तर दिले आहे.

  • Published by:  News18 Desk

ब्रिस्बेन, 10 डिसेंबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील अ‍ॅशेस सीरिजमधील (Ashes Series) पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडने यजमान टीमला चोख उत्तर दिले आहे. इंग्लंडचा कॅप्टन जो रूट (Joe Root) आणि डेव्हिड मलान (David Malan) यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 159 रनची भागिदारी करत इंग्लंडला मॅचमध्ये पुनरागमन करण्याची आशा दाखवली आहे. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस इंग्लंडचा स्कोअर 2 आऊट 220 असा होता. ऑस्ट्रेलियानं पहिल्या इनिंगमध्ये 278 रनची आघाडी घेतली होती. इंग्लंडची टीम अद्यापही 78 रननं मागे आहे.

यावर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या जो रूटने ऑस्ट्रेलियन बॉलर्सना कोणतीही संधी दिली नाही. तो सध्या 158 बॉलमध्ये 86 रन काढून खेळत आहे.  रूट एका कॅलेंडर वर्षात टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रन करणारा इंग्लंडचा बॅटर बनला आहे. त्याने माजी कॅप्टन मायकल वॉनचा 19 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला. रूटने 2021 मध्ये आजवर 1541 रन काढले आहेत. त्याने शुक्रवारी तिसऱ्या सेशनध्ये 1481 रन करणाऱ्या वॉनला मागे टाकले. वॉनने 2002 साली हा रेकॉर्ड केला होता.

रूटने या खेळीच्या दरम्यान स्टीव्ह स्मिथ (1474) आणि वीरेंद्र सेहवाग (1462) यांनाही मागे टाकले. एका कॅलेंडर वर्षात सर्वात जास्त रन करण्याचा रेकॉर्ड पाकिस्तानच्या मोहम्मद युसूफच्या नावावर आहे. त्याने 2006 साली 11 टेस्टमध्ये 1788 रन काढले होते.

इंग्लंडचे ओपनिंग बॅटर रॉरी बर्न्स्स (13) आणि हसीब अहमद (27) हे लंचनंतर लगेच आऊट झाले. त्यानंतर रूटने डेव्हिड मलानच्या जोडीनं इनिंग सावरली. मलानला ऑस्ट्रेलियन स्पिनर नॅथन लायननं काही वेळा त्रस्त केलं. लायनला अद्यापही त्याच्या 400 व्या विकेटची प्रतीक्षा आहे. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस मलान 80 रन वर नाबाद आहे.

'खेळाडूंना हात लावण्यास बंदी, वेगळ्या गेटने प्रवेश', KKR च्या स्टारला मॅचमध्ये पाळावे लागणार कडक नियम

यापूर्वी ऑस्ट्रेलियाची पहिली इनिंग 425 रनर संपुष्टात आली. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेडने (Travis Head) सर्वात जास्त 152 रन काढले. त्याने ही खेळी 14 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने केली. हेड सर्वात शेवटी आऊट झाला. इंग्लंडकडून ओली रॉबिन्सन आणि मार्क वूड यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. ख्रिस वोक्सला 2 तर जॅक लीचला 1 विकेट मिळाली.

First published:

Tags: Ashes, Australia, England, Joe root