मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Ashes Series : डेव्हिड वॉर्नरनं पुन्हा No Ball वर आऊट, पण यंदा 'ती' पंरपरा खंडीत

Ashes Series : डेव्हिड वॉर्नरनं पुन्हा No Ball वर आऊट, पण यंदा 'ती' पंरपरा खंडीत

ऑस्ट्रेलियाचा ओपनिंग बॅटर डेव्हिड वॉर्नरनं (David Warner) अ‍ॅशेस सीरिजची सुरूवात दमदार केली आहे. त्याला पहिल्या इनिंगमध्ये नो बॉलचा फायदा झाला. पण त्याचवेळी त्याची एक परंपरा देखील खंडीत झाली आहे.

ऑस्ट्रेलियाचा ओपनिंग बॅटर डेव्हिड वॉर्नरनं (David Warner) अ‍ॅशेस सीरिजची सुरूवात दमदार केली आहे. त्याला पहिल्या इनिंगमध्ये नो बॉलचा फायदा झाला. पण त्याचवेळी त्याची एक परंपरा देखील खंडीत झाली आहे.

ऑस्ट्रेलियाचा ओपनिंग बॅटर डेव्हिड वॉर्नरनं (David Warner) अ‍ॅशेस सीरिजची सुरूवात दमदार केली आहे. त्याला पहिल्या इनिंगमध्ये नो बॉलचा फायदा झाला. पण त्याचवेळी त्याची एक परंपरा देखील खंडीत झाली आहे.

ब्रिस्बेन, 9 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाचा ओपनिंग बॅटर डेव्हिड वॉर्नरनं (David Warner) अ‍ॅशेस सीरिजची सुरूवात दमदार केली आहे. त्याने पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 94 रन काढले. त्याची टेस्ट क्रिकेटमधील 25 वी सेंच्युरी फक्त 6 रनने हुकली. गुरूवारी झालेल्या खेळात वॉर्नर नशीबवान ठरला. तो 17 रनवर होता तेव्हा बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) बॉलवर क्लीन बोल्ड झाला होता. पण, तो नो बॉल होता. त्याचा फायदा वॉर्नरला झाला.

डेव्हिड वॉर्नर गुरुवारी पाचव्यांदा नो बॉलवर आऊट झाला. त्यानं नो बॉलवर आऊट झाल्यानंतर प्रत्येक वेळी मोठा स्कोअर केला आहे. 2014 साली वॉर्नर भारताविरुद्ध पहिल्यांदा नो बॉलवर आऊट झाला होता. त्यावेळी तो 66 रन काढून खेळत होता. वॉर्नरनं पुढे 145 रनची खेळी केली. 2016 साली पाकिस्तान विरुद्ध 81 रनवर त्याला जीवदान मिळाले. त्यावेळी त्याने 144 रन काढले. 2017 साली इंग्लंड विरुद्ध 99 रनवर तो वाचला. त्याने 103 रन काढले. पाकिस्तान विरुद्ध 2019 साली त्याला पुन्हा एकदा 56 रनवर नो बॉलने साथ दिली. त्या मॅचमध्ये वॉर्नरने 154 रन काढले.

डेव्हिड वॉर्नर ब्रिस्बेन टेस्टपूर्वी चार वेळा नो बॉलवर आऊट झाला होता. त्यानंतर प्रत्येक वेळी त्यानं शतक झळकावले. यंदा ती परंपरा तुटली. वॉर्नरचं शतक फक्त 6 रनने हुकले. त्याला रॉबिन्सनने आऊट केले. पण, त्यापूर्वी त्याने 77 अतिरिक्त रन काढत इंग्लंडची डोकेदुखी वाढवली.

ऑस्ट्रेलियाकडे भक्कम आघाडी

ब्रिस्बेन टेस्टच्या दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियानं 196 रनची आघाडी घेतली आहे. इंग्लंडची पहिल इनिंग बुधवारी 147 मध्ये संपुष्टात आली होती. त्याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस 7 आऊट 343 रन केले आहेत. वॉर्नरच्या 94 रन्ससह ट्रेव्हिस हेडचं (Trevis Head) आक्रमक शतक हे दुसऱ्या दिवसाचं वैशिष्टय ठरलं.

रोहित शर्मानंतर राहुलला मिळणार टीम इंडियाची मोठी जबाबदारी, BCCI करणार घोषणा

हेडने फक्त 85 बॉलमध्ये 12 फोर आणि 2 सिक्ससह शतक झळकावले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा हेड 112 आणि मिचेल स्टार्क 10 रन काढून नाबाद होते.

First published:
top videos

    Tags: Ashes, Australia, Cricket, David warner, England