जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / AUS vs ENG, Ashes 1st Test : इंग्लंडची खराब सुरूवात, ऑस्ट्रेलियन बॉलर्सनं केली वाताहत

AUS vs ENG, Ashes 1st Test : इंग्लंडची खराब सुरूवात, ऑस्ट्रेलियन बॉलर्सनं केली वाताहत

AUS vs ENG, Ashes 1st Test : इंग्लंडची खराब सुरूवात, ऑस्ट्रेलियन बॉलर्सनं केली वाताहत

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील प्रतिष्ठेच्या अ‍ॅशेस सीरिजला (Ashes Series) सुरुवात झाली आहे. पाच टेस्टच्या या सीरिजमधील पहिली टेस्ट ब्रिस्बेनमध्ये होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

ब्रिस्बेन, 8 डिसेंबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील प्रतिष्ठेच्या अ‍ॅशेस सीरिजला (Ashes Series) सुरुवात झाली आहे. पाच टेस्टच्या या सीरिजमधील पहिली टेस्ट ब्रिस्बेनमध्ये होत आहे. या टेस्टमध्ये टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटींग करण्याचा जो रूटचा (Joe Root) निर्णय त्याच्या टीमच्या अंगाशी आला. ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर्सनं पहिल्या सेशनवर वर्चस्व गाजवलं आहे. इंग्लंडला मोठे धक्के इंग्लंडची पहिल्या दिवशी सकाळी सुरूवात धक्कादायक झाली. मिचेल स्टार्कनं मॅचच्या (Mitchell Starc) पहिल्याच बॉलवर बर्न्सला आऊट केले.  या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच डेव्हीड मलानला हेजलवूडने (Josh Hazelwood) आऊट केले. त्यानंतर हेजलवूडनेच इंग्लंडला मोठा धक्का दिला. त्याने यावर्षी जबरदस्त फॉर्मात असलेला इंग्लंडचा कॅप्टन जो रूटला शून्यावर आऊट केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करणारा इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक्सही (Ben Stokes) अपयशी ठरला. ऑस्ट्रेलियन टेस्ट टीमचा नवा कॅप्टन पॅट कमिन्सनं (Pat Cummins) स्टोक्सचा अडथळा दूर करत इंग्लंडला चौथा धक्का दिला. त्यानंतर हसीब हमीद आणि ओली पोप या जोडीनं लंचपर्यंत इंग्लंडची अधिक पडझड होऊ दिली नाही. लंचसाठी खेळ थांबला तेव्हा इंग्लंडचे 4 आऊट 59 रन झाले होते.

जाहिरात

ऑस्ट्रेलियन टीमचं या सीरिजमध्ये नेतृत्त्व पॅट कमिन्स करत आहे. महिला सहकाऱ्याशी अश्लील वर्तन केल्याबद्दल  त्यांचा यापूर्वीचा कॅप्टन टीम पेनला राजीनामा द्यावा लागला होता. पेनच्या जागेवर विकेट किपर म्हणून  अ‍ॅलेक्स कॅरीची निवड करण्यात आली असून त्याने बुधवारी टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. IND vs SA : टीम इंडियाची होणार आज निवड, रोहितला मिळणार मोठी जबाबदारी!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात