जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Ashes 1st Test : वर्षभरातील हिरो, ऑस्ट्रेलियात Zero! विराटला टशन देणारा खेळाडू फेल, VIDEO

Ashes 1st Test : वर्षभरातील हिरो, ऑस्ट्रेलियात Zero! विराटला टशन देणारा खेळाडू फेल, VIDEO

Ashes 1st Test : वर्षभरातील हिरो, ऑस्ट्रेलियात Zero! विराटला टशन देणारा खेळाडू फेल, VIDEO

अ‍ॅशेस सीरिजची (Ashes Series) सुरूवात इंग्लंडसाठी धक्कादायक झाली आहे. ब्रिस्बेन टेस्टच्या पहिल्या दिवशी लंचपूर्वीच इंग्लंडची टॉप ऑर्डर कोसळली.

  • -MIN READ
  • Last Updated :

ब्रिस्बेन, 8 डिसेंबर : अ‍ॅशेस सीरिजची (Ashes Series) सुरूवात इंग्लंडसाठी धक्कादायक झाली आहे. ब्रिस्बेन टेस्टच्या पहिल्या दिवशी लंचपूर्वीच इंग्लंडची टॉप ऑर्डर कोसळली. ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर्सनी घरच्या परिस्थितीचा पूर्ण फायदा घेत वर्चस्व गाजवले. मिचेल स्टार्क (Mitchell Starc), जोश हेजलवूड (Josh Hazelwod ) आणि कॅप्टन पॅट कमिन्स (Pat Cummins) या तिन्ही फास्ट बॉलर्लनी विकेट्स घेत पाहुण्या टीमला बॅकफुटवर ढकललं आहे. इंग्लंडचा कॅप्टन जो रूट (Joe Root) बुधवारी अपयशी ठरला. त्याला हेजलवूडने शून्यावर आऊट केले.  जो रूटची तुलना ही नेहमीच टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीसोबत (Virat Kohli) केली जाते. या वर्षात विराटची बॅट शांत आहे, तर रूटनं मात्र भरपूर रन केले आहेत. त्याने 13 टेस्टमध्ये 6 सेंच्युरीसह 1455 रन केले आहेत. भारताविरुद्ध चेन्नई टेस्टमध्ये द्विशतक करणाऱ्या रूटने इंग्लंडमध्येही टीम इंडियाला चांगलाच त्रास दिला होता.  जबरदस्त फॉर्मात असलेला रूट यावर्षी पहिल्यांदाच शून्यावर आऊट झाला आहे.

जाहिरात

जो रूटने आजवर सर्व देशांमध्ये रन केले असले तरी त्याला आजवर ऑस्ट्रेलियात एकही शतक झळकावता आलेलं नाही. या सीरिजमध्ये रूट हा इतिहास बदलेल अशी सर्वांची अपेक्षा आहे. पण, बुधवारी त्याने निराशाजनक सुरूवात केली. सकाळच्या सेशनमध्ये बर्न्स आणि मलान झटपट आऊट झाल्यानं रूट बॅटींगला आला. त्यावेळी टीमची त्याच्याकडून मोठी अपेक्षा होती. पण रूट फक्त 7 बॉल मैदानात टिकला. AUS vs ENG, Ashes 1st Test : इंग्लंडची खराब सुरूवात, ऑस्ट्रेलियन बॉलर्सनं केली वाताहत इंग्लंडचा शून्याचा रेकॉर्ड इंग्लंडचे टॉप 7 बॅटर्स या वर्षभरात 29 वेळा शून्यावर आऊट झाले आहेत. हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. यापूर्वी 1988 साली इंग्लंडच्याच खेळाडूंनी 27 वेळा शून्यावर आऊट होत रेकॉर्ड केला होता. 23 वर्ष जूना हा रेकॉर्ड यंदा त्यांनीच मोडला आहे. ब्रिस्बेन टेस्टमध्ये कॅप्टन रूटसह रॉरी बर्न्स देखील शून्यावर आऊट झाला आहे. त्याला मिचेल स्टार्कनं मॅचच्या पहिल्याच बॉलवर आऊट केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात